शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

लॉस एंजेलिसमध्ये ५ दिवसांपासून निदर्शने सुरू, ट्रम्प यांनी मरीन अन् नॅशनल गार्ड तैनात केले; विरोधाचं नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:46 IST

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी केलेल्या छाप्यांनंतर शहरात निदर्शने सुरूच आहेत. लॅटिन लोकवस्ती असलेल्या भागात अटक झाल्यानंतर लोक संतप्त झाले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी केली.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने सुरू आहेत. बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांनी शहरात छापे टाकले, यामध्ये अनेकांना अटक करण्यात आली. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात असलेल्या लॉस एंजेलिसची लोकसंख्या अत्यंत वैविध्यपूर्ण आहे.

लॉस एंजेलिस हा अमेरिकेतील सर्वात श्रीमंत आणि सर्वात शक्तिशाली लोकांचे ठिकाण मानले जाते. या शहरातील ५६ टक्के लोक इंग्रजी तसेच स्पॅनिश बोलतात.

पाकिस्तानी पत्रकारांनी शाहबाज सरकारला दाखवली जागा, भर पत्रकार परिषदेत केला अर्थमंत्र्यांचा अपमान!

शुक्रवारी लॉस एंजेलिसमधील इमिग्रेशन आणि कस्टम्स अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी लॅटिनो लोकवस्ती असलेल्या भागात छापे टाकले. यावेळी त्यांनी बेकायदेशीर स्थलांतरित आणि टोळी सदस्य असल्याचा आरोप असलेल्या अनेक लोकांना अटक केली. यावेळी मोठा गोंधळ सुरू झाला. 

यानंतर, शहरातील लोक संतप्त झाले. त्यांनी अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, एजन्सीने या निषेधावर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.

पाच दिवसांपासून निदर्शने सुरू

एजन्सीच्या या कारवाईमुळे जमावाचा राग आणखी वाढला. ट्रम्प प्रशासनाने ७०० मरीन आणि ४००० हून अधिक नॅशनल गार्ड सैनिक तैनात केले आहेत. पण अजूनही निदर्शने थांबलेले नाहीत.

लॉस एंजेलिसमधील अर्ध्याहून अधिक नागरिक परदेशी वंशाचे आहेत. यापैकी १.८९ मिलियन स्वतःला लॅटिन म्हणून ओळखतात, तर ०.५ मिलियन आशियाई, हवाईयन आणि पॅसिफिक आयलंडर आहेत. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका