शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गाझावरील हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांची पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घराबाहेर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 17:44 IST

Israel Palestine Conflict : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी रोखलं.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. गाझा पट्टीच्या आजूबाजूच्या समुदायांवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी रोखलं. निळे आणि पांढरे इस्रायली झेंडे फडकावत "आता तुरुंगात जा!" अशी घोषणाबाजी केली. हजारो लोकांनी जेरुसलेममधील नेतन्याहू यांच्या निवासस्थानाभोवती असलेलं पोलीस बॅरियर देखील पार केलं. 

एका सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की तीन चतुर्थांश इस्रायली लोकांचं मत आहे की नेतन्याहू यांनी राजीनामा द्यावा. नेतन्याहू यांनी अद्याप अपयशाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारली नाही ज्यामुळे अचानक हल्ला झाला. हमासने 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर हल्ला केला, 1,400 हून अधिक ठार केले आणि किमान 240 लोकांना ओलीस ठेवलं. लोकांचा संताप हळूहळू वाढला आहे, गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या अनेक कुटुंबांनी सरकारच्या प्रतिसादावर जोरदार टीका केली आणि त्यांच्या नातेवाईकांना घरी आणण्याची मागणी केली.

तेल अवीवमध्ये, हजारो लोकांनी झेंडा हातात घेऊ निदर्शनं केली. कोणतीही किंमत मोजून ओलिसांची सुटका करा अशा घोषणा असलेले पोस्टर्स हातात होते. इस्रायलने गाझामध्ये हवाई आणि जमिनीवर हल्ले केले आहेत, 9,000 हून अधिक लोक मारले आहेत. युद्धापूर्वीही, नेतन्याहू भ्रष्टाचाराच्या आरोपांशी लढत होते. त्यानंतर आता हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. 

शनिवारी, इस्रायलच्या चॅनल 13 टेलिव्हिजनच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की 76% इस्रायली लोकांना वाटतं की आता पंतप्रधान म्हणून काम करणाऱ्या नेतन्याहू यांनी राजीनामा द्यावा. तर 64% लोकांनी युद्धानंतर लगेचच निवडणुका घ्याव्यात असं म्हटलं आहे. सर्वेक्षणानुसार, हल्ल्यासाठी सर्वात जास्त कोण जबाबदार आहे असं विचारलं असता, 44% इस्रायलींनी नेतन्याहू यांना दोष दिला, तर 33% लोकांनी लष्कर प्रमुख आणि वरिष्ठ आयडीएफ अधिकार्‍यांना दोषी धरले आणि 5% लोकांनी संरक्षण मंत्री यांना दोष दिला.  

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध