शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
3
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
4
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
5
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
6
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
7
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
8
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
9
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
10
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
11
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
12
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
13
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
14
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
15
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
16
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
17
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
18
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
19
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
20
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य

श्रीलंका निवडणुकीत चीन समर्थक महिंदा राजपक्षेंना दोन तृतीयांश बहुमत, भारताची डोकेदुखी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 14:30 IST

या जोरदार विजयामुळे पुन्हा एकदा श्रीलंकेत महिंदा राजपक्षे परतणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. 

कोलंबो - पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीनं शुक्रवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत चांगलाच विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार 225 सदस्यांच्या संसदेत एसएलपीपीने एकट्याने 145 जागा जिंकल्या आणि मित्र पक्षांनी मिळून एकूण 150 जागा जिंकल्या. अशा प्रकारे पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. पक्षाला 68 लाख म्हणजेच 59.9 टक्के मते मिळाली. या जोरदार विजयामुळे पुन्हा एकदा श्रीलंकेत महिंदा राजपक्षे परतणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या जबरदस्त विजयाबद्दल त्यांना अभिनंदन करणारे पहिले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. ते म्हणाले की, दोन्ही बाजू सर्व क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांना पुढे नेण्याचे कार्य करतील आणि विशेष संबंध नवीन उंचावर नेले जातील. ही माहिती देताना राजपक्षे यांनी ट्विट केले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर माझे अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद." श्रीलंकेच्या जनतेच्या पाठिंब्याने दोन्ही देशांमधील दीर्घकाळ कामकाज सुरू ठेवण्यासाठी तुमच्याबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे. श्रीलंका आणि भारत चांगले मित्र आणि सहयोगी आहेत. ”महिंदा राजपक्षे यांना चीन समर्थक म्हणून ओळखले जात असल्यानं ते भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात. 'महिंदा राजपक्षे यांना भारत आणि चीन या दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास आवडेल'आंतरराष्ट्रीय कामकाज तज्ज्ञ कमर आगा यांनी सांगितले की, श्रीलंका स्वत: च्या फायद्यासाठी भारत आणि चीनकडून फायदा घेत आहे. श्रीलंका आपले काही प्रकल्प चीन आणि काही भारताला हलवण्याच्या विचारात आहे. महिंदा राजपक्षे यांना दोन्ही देशांशी संबंध चांगले ठेवायचे आहेत. चीनशी चांगले संबंध असले तरी भारताशी संबंध बिघडू न देण्याचं राजपक्षे यांचे धोरण आहे. भारत हा एक मोठा शेजारी देश आहे आणि येत्या काळात भारताशी शत्रुत्व त्यांना महागात पडू शकते. इतकेच नव्हे तर श्रीलंकेतील सिंहला आणि तमीळ समुदायाच्या लोकांनाही भारताशी त्यांचे संबंध बिघडू नये, अशी इच्छा आहे. राजपक्षे यांनी चीनला श्रीलंकेत लष्करी कारवाया करू देऊ नयेत, अशी भारताची इच्छा आहे.दुसरीकडे परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ डॉ. रहिस सिंह म्हणतात, "राजपक्षे हे त्यांच्या शेवटच्या कार्यकाळात चीन समर्थक राहिले. त्यांनी श्रीलंकेचे चीनच्या उपनगरीत रूपांतर केले. राजपक्षे यांच्या मते आणि धोरणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तेच धोरण पुढेही सुरू ठेवू इच्छित आहेत. दुसरीकडे चीन आपल्यावर सतत हल्ला करत आहे. एकीकडे त्याला लडाखमधील जमीन ताब्यात घ्यायची आहे, तर ड्रॅगनच्या भारताच्या शेजारी देश नेपाळ, बांगलादेशातही कुरबुरी सुरू आहेत. नेपाळही भारताला डोळे दाखवायला लागला आहे. पाकिस्तान त्याच्या बाजूने आहे, बांगलादेश आणि चीनमधील मैत्री वाढत आहे.राजपक्षे यांच्या विजयानंतर आता पुन्हा एकदा चीनने आपल्या रणनीतीमध्ये यश मिळवले आहे. श्रीलंकेमध्ये 10 वर्षांत पुन्हा एकदा चीननं मजबूत पाया रचला आहे. एक प्रकारे चीन भारताच्या विरोधात दुहेरी भिंत बनवत चालला आहे. डॉ. सिंग यांनी सुचवले आहे की, आता भारताची धोरणे बदलताना आक्रमकतेने काम करावे लागेल. हंबनटोटा बंदर 99 वर्षं चीनला दिलेआपल्या आधीच्या कार्यकाळात राजपक्षे यांनी चीनबरोबर अनेक करार केले होते, ज्यामुळे भारत आणि पाश्चात्य देशांचा ताण वाढला होता. 2017मध्ये राजपक्षे यांनी कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यावर रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे हंबनटोटा बंदर चीनला 99 वर्षांसाठी चीनला दिले. हे बंदर भारताच्या अगदी जवळ आहे. राजपक्षे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्यांनी तमीळ बंडखोरांवर निर्दयीपणे अत्याचार केल्याची चर्चा आहे.