शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

प्रियांका चोप्राची Hollywood Entry, झळकणार बे वॉचमध्ये

By admin | Updated: February 17, 2016 13:33 IST

बॉलीवूडमधली आघाडीची हिरॉइन प्रियांका चोप्रा हॉलीवूडमध्ये पदार्पण करत असून ड्वेन जॉन्सनबरोबर ती बेवॉचमध्ये झळकणार आहे

बॉलीवूडमधली आघाडीची हिरॉइन प्रियांका चोप्रा हॉलीवूडमध्ये पदार्पण करत असून ड्वेन जॉन्सनबरोबर ती बे वॉचमध्ये झळकणार आहे. रॉक या नावाने ओळखल्या जाणा-या ड्वेनने टि्वटरच्या माध्यमातून ही बातमी कळवली आहे. प्रियांका बे वॉचच्या टीममध्ये जॉइन झाल्याचे त्यानं जाहीर केल्यावर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. कुस्तीचा आखाडा गाजवलेल्या ड्वेननं हॉलीवूडमध्येही अॅक्शनपटांमध्ये छाप उमटवली असून त्याच्यासोबत प्रियांकाही आपली मोहर हॉलीवूडमध्ये उमटवेल अशी आशा आहे. विशेष म्हणजे प्रियांका बे वॉचमध्ये खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असून उत्कृष्ट नायिका असलेली प्रियांका खलनायिका म्हणूनही चांगलं काम करेल असं कौतुक ड्वेननं केलं आहे.
ड्वेनने प्रियांका ही जगातली सगळ्यात मोठ्या स्टार्सपैकी एक असल्याचं प्रशस्तीपत्रकही देऊन टाकलं असून त्यानं प्रियांकाबरोबरचे फोटो आणि व्हिडीयो क्लिपही शेअर केली आहे. 
बे वॉच या अत्यंत लोकप्रिय मालिकेवर आधारीत हा सिनेमा असून एबीसी चॅनेलवरच्या क्वान्टिको या मालिकेतल्या अलेक्स परीश या एफबीआयच्या एजंटच्या रोलमुळे प्रियांका आधीच जगभरच्या प्रेक्षकांच्या परीचयाची झालेली आहे. बे वॉचमुळे तिची हॉलीवूडशी नाळ जुळत असून तिकडेही ती चांगलीच लोकप्रिय होईल अशी अपेक्षा आहे. 
याआधी ऐश्वर्या रायने हॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवला होता, तर दिपिका पदुकोणही विन डिझेलबरोबर हॉलीवूडमधल्या एका चित्रपटात झळकत आहे. बॉलीवूडमधल्या नट्यांना हॉलीवूडमध्ये चांगले दिवस आलेले यावरून दिसत आहे.