शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युक्रेन दौऱ्याचे अमेरिकेकडून कौतुक, व्हाईट हाऊसकडून निवेदन जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 13:30 IST

PM Modi Ukraine Visit: मोदींचा युक्रेन दौरा हा संघर्ष संपवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे

PM Modi Ukraine Visit: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या युक्रेन दौऱ्यावर रशिया आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष होते. त्यांचा दौरा अशा वेळी झाला जेव्हा युक्रेनने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कुर्स्कमधील रशियन भागांचा ताबा घेतला. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध अधिक तीव्र होताना दिसले. मात्र पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर काही चांगल्या गोष्टी घडू शकतात अशा अपेक्षा आहेत. पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्यासंदर्भात अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदींचा युक्रेन दौरा हा रशिया-युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

मोदी शुक्रवारी ट्रेनने युक्रेनला पोहोचले. १९९२ मध्ये दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध प्रस्थापित झाल्यानंतर युक्रेनला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. या दौऱ्यावर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा संपर्क सल्लागार जॉन किर्बी म्हणाले की, भारत हा अमेरिकेचा भक्कम सहकारी आहे. युक्रेनमधील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नात मदत करण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही देशाचे अमेरिका स्वागत करते. कीव शहर शांततापूर्ण होण्यासाठी हा दौरा चांगले योगदान देऊ शकते.

जॉन किर्बी म्हणाले की, युक्रेन संघर्षावरील कोणत्याही चर्चेसाठी युक्रेनला पुढाकार घ्यावा लागेल. युद्ध संपवण्यासाठी कोणताही इतर देश मदत करत असेल तर अमेरिका त्या देशाच्या प्रयत्नांचे कौतुक करेल. तसेच, युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांसाठी मदतही करेल. पण या मदतीचा अर्थ असा असेल की त्या देशालाही चर्चेत सहभागी व्हावे लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या द्विपक्षीय बैठकीत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना सांगितले की, युक्रेनमधील संघर्ष संपवण्याचा एकमेव उपाय म्हणजे संवाद. भारत कधीही तटस्थ राहिला नाही, आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने आहोत. भारत शांतता आणि प्रगतीच्या मार्गावर सक्रिय भूमिका बजावण्यास तयार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात भारत आणि युक्रेनमध्ये चार करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाUSअमेरिकाAmericaअमेरिका