वॉशिंग्टन :कोलंबिया विद्यापीठाला दिला जाणारा निधी थांबवल्याच्या प्रकरणात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर नमते घेत विद्यापीठ प्रशासनाने सरकारशी तडजोड स्वीकारली आहे. यानुसार, हे विद्यापीठ आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देईल व याच्या मोबदल्यात अमेरिकी सरकार विद्यापीठाला दिला जाणारा निधी पुन्हा सुरू करील.कोलंबिया विद्यापीठात ज्यूविरोधी भावना वाढीस लागली असल्याच्या कारणामुळे ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठाला दिला जाणारा निधी थांबवला होता. आता सरकारशी झालेल्या नव्या करारानुसार विद्यापीठ सरकारला तीन वर्षांत २० कोटी डॉलर एवढी रक्कम देईल. लैंगिक छळातील आरोपीच्या फाइलमध्ये ट्रम्प यांचे नावअल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळातील आरोपी जेफ्री एम्प्स्टीनच्या फाइलमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव असल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकी वेबसाईटस् सीएनन व वॉल स्ट्रीट जर्नलने ही माहिती दिली आहे.
जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अधिकार कायमराष्ट्राध्यक्ष ट्रम्प सध्या स्थलांतरितांच्या मुलांचा जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अधिकार रद्द करू शकणार नाहीत. अमेरिकेच्या एका संघीय अपिलीय न्यायालयाने बुधवारी त्यांचा निर्णय असंवैधानिक घोषित केला.अमेरिकेत जन्माला आल्यावर स्वयंचलित नागरिकत्वाचा अधिकार संपवण्याचा प्रयत्न संविधानाच्या विरुद्ध असल्याचे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. या आदेशाच्या देशभर अंमलबजावणीवर बंदी घालणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला न्यायालयाने मान्यता दिली.हा महत्त्वाचा निर्णय नवव्या यूएस सर्किट कोर्ट ऑफ अपीलच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला आहे.