शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्राध्यक्ष म्हणून फ्रान्स जनतेला हवेत बराक ओबामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 14:42 IST

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पदभार सोडला असला, तरी त्यांच्या लोकप्रियतेत अजून तिळभरही कमी झाली नाही. त्यांच्या नेतृत्वाची भुरळ जगातील लोकांना पडली आहे.

ऑनलाइन लोकमतपॅरिस, दि. 27 - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पदभार सोडला असला, तरी त्यांच्या लोकप्रियतेत अजून तिळभरही कमी झाली नाही. त्यांच्या नेतृत्वाची भुरळ जगातील लोकांना पडली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ते आपल्या कुटुंबासमवेत वाशिंगटनमध्ये राहत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणामुळे फ्रान्समधील जनतेला ते राष्ट्रपती हवे आहेत. सध्या फ्रान्समध्ये राष्ट्रध्यक्ष पदासाठी निवडणूका सुरु आहेत. त्याचबरोबर देशात राष्ट्रपती निवडीबाबत चाललेल्या गोंधळामुळे लोकांचा निवडणुकीमधील रस कमी होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी एक अकल्पित व असंभाव्य युक्ती शोधून काढण्यात आली आहे. ओबामा२०१७ संकेतस्थळाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष व्हावे यासाठी याचिका तयार केली आहे. तसेच जनतेला या याचिकेला समर्थन देण्यासाठी स्वाक्षरी करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. दरम्यान या संकेतस्थळाला फ्रान्सवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून 15 मार्चपर्यंत 27000 लोकांनी या याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.ओबामा यांनी २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाचा त्याग केला. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ओबामा यांनी दोन वेळा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा भार सांभाळला असून त्यांना फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षपदी का नेमू नये? देशात पुरोगामी बदल करण्यास तयार असून तसाच एक पुरोगामी प्रस्ताव आम्ही त्यांना देत आहोत, असे या संकेतस्थळाचे म्हणणे आहे.संकेतस्थळाच्या निर्मात्यापैकी एकाने एनपीआरशी बोलताना सांगितले की, नावडत्या उमेदवाराविरोधात मत देण्याऐवजी, आवडत्या उमेदवारासाठी मत देणे नक्कीच सकारात्मक असेल. ओबामा यांच्या नावाचा विचर त्यातूनच आला आहे. या विचाराची निर्थकता आम्हाला माहीत आहे. ओबामा हे फ्रान्सचे नागरिक नसून त्यांना फ्रेंच भाषा देखील बोलता येत नाही. या प्रयत्न निव्वळ गमंत असून यामागे जनतेला फ्रान्सच्या राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी जागरूक करणे हे आहे.