वॉशिंग्टन : नववर्षाच्या पूर्वसंध्येला अगदी आम ते खास प्रत्येकाचे कार्यक्रम ठरलेले असतात. पण कुठल्याही पार्टीचे आवतण न घेता थेट टीव्हीसमोर बसावे आणि डोळे फाडून बघावे असा कार्यक्रम डिस्कव्हरी वाहिनी ३१ डिसेंबर रोजी प्रसारित करणार आहे. इटन अलाइव्ह ही दोन तासांची विशेष मालिका रात्री ८ वाजता दाखवली जाईल. डोळ्यांचं पातं लवणार नाही इतका प्रचंड थरार यात पाहायला मिळेल. कारण सर्प वैज्ञानिक आणि पर्यावरण तज्ज्ञ पॉल रोसोली अमॅझॉन खोऱ्यातील महाकाय आणि हिंस्त्र अशा ग्रीन अॅनाकोंडा या राक्षसी सर्पाच्या पोटात जाऊन जिवंत परतल्याचं थरारक चित्रण यात पाहायला मिळेल.अमॅझॉन जंगल अनेक दुर्मीळ-वन्य प्राण्यांचं वस्तिस्थान असलं तरी त्यांच्या जीवन पद्धतींबद्दल अजूनही बरीचशी माहिती पर्यावरणतज्ज्ञांकडे उपलब्ध नाही. अॅनाकोंडा ही तर अतिशय विषारी आणि एक प्रकारे दुर्मीळ होत चाललेली सर्पजात. त्याच्या पोटात शिरल्याखेरीज त्याच्या अंतर्गत रचनेबद्दल-प्रजनन पद्धतीबद्दल अधिक आणि सविस्तर माहिती मिळणं अशक्य आहे हे समजल्यावर रोसोली यांनी स्वसंरक्षणासाठी एक विशिष्ट प्रकारचा सूट परिधान केला होता, तरी कोणत्याही क्षणी अॅनाकोंडा त्यांना पचवेल ही भीती होतीच. (वृत्तसंस्था)
‘इटन अलाइव्ह’ची प्रस्तुती नववर्षाच्या पूर्वसंध्येला
By admin | Updated: December 22, 2014 02:48 IST