शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमधील प्रचंड यांचं सरकार कोसळलं, संसदेत विश्वासमत गमावल्यानंतर दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 18:44 IST

Nepal Political Update: भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल ‘प्रचंड’ यांनी संसदेतील बहुमत चाचणीमध्ये पराभव झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल ‘प्रचंड’ यांनी संसदेतील बहुमत चाचणीमध्ये पराभव झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १९ महिने नेपाळच्या सत्तेवर असलेल्या प्रचंड यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएल आघाडीने काढून घेतला होता. त्यामुळे प्रचंड यांना सभागृहात विश्वासमताला सामोरे जावे लागले. त्यात प्रचंड यांचा पराभव झाला. दरम्यान, कम्युनिस्ट पार्टीचे के. पी. शर्मा ओली हे नवे पंतप्रधान असतील, यावर विरोधी पक्षांच्या आघाडीचं एकमत झालं आहे. 

प्रचंड यांनी २५ डिसेंबर २०२२ रोजी नेपाळच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र तेव्हापासून आतापर्यंत ५ वेळा विश्वासमताचा सामना करावा लागला होता. दरम्यान, आज झालेल्या विश्वासदर्शक ठरावामध्ये विजय मिळवण्यासाठी प्रचंड यांच्या पक्षाला प्रतिनिधी सभेतील २७५ सदस्यांपैकी किमान १३८ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता होता. मात्र एवढा पाठिंबा मिळवण्यात प्रचंड हे अपयशी ठरले. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

सध्या नेपाळ काँग्रेसजवळ  सभागृहात ८९ सदस्य आहेत. तर सीपीएन-यूएमएलजवळ ७८ सदस्य आहेत. दोघांची बेरीज १६७ होते. ती बहुमताच्याआकड्यापेक्षा अधिक आहे. तर प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी सेंटर) कडे ३२ सदस्य आहेत. दरम्यान नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांनी आधीच के. पी. शर्मा ओली यांना पाठिंबा दिला आहे.  

टॅग्स :NepalनेपाळInternationalआंतरराष्ट्रीय