शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार-हत्येच्या आरोपाखाली 11 वर्षे होते तुरुंगात, आता पाकिस्तानचे 14 वे राष्ट्रपती बनले आसिफ अली झरदारी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 19:54 IST

Asif Ali Zardari : आसिफ अली झरदारी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवले आणि सहज विजय मिळवला.

Asif Ali Zardari  : आसिफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानचे 14 वे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेणार आहेत. दोन्ही सभागृहात त्यांना बहुमत मिळाले आणि तीन प्रांतातही प्रचंड बहुमत मिळाले. आसिफ अली झरदारी यांच्या पत्नी आणि पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर त्यांना जवळपास दशकभर तुरुंगात राहावे लागले होते.

आसिफ अली झरदारी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवले आणि सहज विजय मिळवला. त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आणि देशातील चारपैकी तीन प्रांतांच्या विधानसभेत बहुमत मिळाले. आसिफ अली झरदारी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार महमूद अचकझाई यांचा 230 मतांनी पराभव केला. आसिफ अली झरदारी यांना 411 मते मिळाली, तर महमूद अचकझाई यांना 118 मते मिळाली. 

निवडणुकीचे अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. आसिफ अली झरदारी यांच्या दोन्ही मुलींनी वडिलांच्या विजयाबद्दल पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अभिनंदन केले. भ्रष्टाचार आणि खुनाच्या आरोपाखाली आसिफ अली झरदारी 11 वर्षे तुरुंगात होते, तरीही ते कधीही दोषी आढळले नाहीत. आता त्यांचे राष्ट्रपती होणे, हे त्यांचे राजकारणात पुनरागमन आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नवसंजीवनी मिळणार आहे.

दुसऱ्यांदा बनले पाकिस्तानचे राष्ट्रपतीआसिफ अली झरदारी दुसऱ्यांदा पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी 2008 ते 2013 दरम्यान त्यांनी पाकिस्तानचे 11 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ते पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती होते आणि त्यांनी त्यांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पुढील राष्ट्रपतींना पदभार सोपवला होता. बेनझीर भुट्टो सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. मात्र, सरकार पडल्यानंतर त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आणि त्यांना अटकही झाली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPresidentराष्ट्राध्यक्ष