शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिलेचा मृत्यू, पोर्तुगालच्या आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 10:48 IST

पोर्तुगालच्या राजधानीत मंगळवारी तेथील आरोग्य मंत्र्यांची खूर्ची घालविणारा प्रकार घडला. भारतासाठी ते काहीच नसले तरी तेथील लोकांसाठी ही मोठी घटना होती

पोर्तुगालच्या राजधानीत मंगळवारी तेथील आरोग्य मंत्र्यांची खूर्ची घालविणारा प्रकार घडला. भारतासाठी ते काहीच नसले तरी तेथील लोकांसाठी ही मोठी घटना होती. एक भारतीय गर्भवती महिला पर्यटकाचा कार्डियाक अरेस्टमुळे हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होते. तेव्हा तिने प्राण सोडला. यावरून तेथील आरोग्य मंत्र्यांना राजीनामा दिल्यावा लागला आहे. 

या घटनेच्या काही तासांनी मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला. रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता, आपत्कालीन कार सेवा बंद करणे आणि गर्भवती महिलांसाठी योग्य आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे टेमिडो यांना तीव्र टीकेचा सामना करावा लागला. या कारणास्तव त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.

टेमिडोने जे काही केले त्याबद्दल मी आभारी आहे. विशेषत: कोरोनाच्या काळात तिने  आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले होते, असे पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी म्हटले. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय महिला 31 आठवड्यांची गर्भवती होती आणि तिला देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या सांता मारिया रुग्णालयात नेण्यात आले. महिलेने श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली होती.

महिलेची प्रकृती स्थिर झाल्यानंतर रुग्णालयाने तिला साओ फ्रान्सिस्को जेवियर रुग्णालयात हलविले, बेड उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले होते. रुग्णालयात नेत असताना महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. महिलेवर शस्त्रक्रिया करून नवजात शिशुला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. 

टॅग्स :Portugalपोर्तुगालWomenमहिला