शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

आता अमेरिकेतही घुमतेय PM मोदींची लोकसभा निवडणुकीतील घोषणा, ट्रम्प यांच्या पक्षाने जशीच्या तशी उचलली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 15:07 IST

अमेरिकेतील राष्ट्रपती पदाची निवडणूक आता रोमांचक वळणावर गेली आहे. एकीकडे ज्यो बायडेन यांनी आपले नाव निवडणुकीतून परत घेतले आहे ...

अमेरिकेतील राष्ट्रपती पदाची निवडणूक आता रोमांचक वळणावर गेली आहे. एकीकडे ज्यो बायडेन यांनी आपले नाव निवडणुकीतून परत घेतले आहे आणि कमला हॅरिस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. तर दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षातही जबरदस्त उत्साह दिसत आहे. डेमोक्रॅट्स गटातील अनिश्चिततेच्या वातावरणाने डोनाल्ड ट्रम्प यांना बळ मिळाले आहे.

ट्रम्प यांनी जशीच्या तशी उचलली भाजप/मोदींची घोषणा -आता अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने भाजप अथवा पंतप्रधान मोदींची घोषणा जशीच्या तशी उचलली आहे. रिपब्लिकन पक्षाने 'अबकी बार 400 पार' चा नारा दिला आहे. हीच घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक-2024 मध्ये दिली होती. यावेळचे वातावरण पाहता, 400 इलेक्टोरल मतांचा आकडा ओलांडला जाऊ शकतो, असे डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांना वाटते. 

राष्ट्रपती होण्यासाठी किती मते लागतात? -अमेरिकेतील एकूण 50 राज्यांमध्ये 538 इलेक्टोरल मते आहेत. यांपैकी ज्या उमेदवाराला 270 मते मिळतात, तो राष्ट्रपती होत असतो. साधारणपणे 20-20 राज्यांमध्ये दोन्ही पक्ष जिंकतात. मात्र उरलेल्या 10 राज्यांतून निर्णय येतो. सर्वसाधारणपणे जो पक्ष पॉप्युलर मते जिंकतो, तो राज्यातील सर्व इलेक्टोरल मतेही मिळवत असतो. 

आतापर्यंत आलेल्या पोलनुसार, 20 राज्यांतून 251 इलेक्टोरल मते डोनाल्ड ट्रम्प यांना मिळू शकतात. जर सर्व्हेचा अंदाज खरा ठरला तर त्यांना केवळ 19 मतेच हवी आहेत. यातच, पेन्सिलव्हेनिया, एरिजोना, नवादा, मिशिगन सारख्या राज्यांतून डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी काही मते मिळू शकतात आणि त्यांचा राष्ट्रपती बनण्याचा मार्ग निश्चित होऊ शकतो. मात्र, हा विजय ऐतिहासिक व्हावा, यासाठी रिपब्लिक पक्षाचे नेते 400 पारची घोषणा देत आहेत. महत्वाचे म्हणजे, ज्यो बायडेन यांनी रेसमधून माघार घेतल्यानंतर, त्यांच्या आशा अधिकच वाढल्या आहेत. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाElectionनिवडणूक 2024