शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

PM Narendra Modi: PM मोदींचा जगभरात डंका, पापुआ न्यू गिनी आणि फिजीने सर्वोच्च पुरस्काराने केले सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 13:37 IST

PM Narendra Modi: फिजीने 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी', तर पापुआ न्यू गिनीने 'द ग्रँड कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे.

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आधी जपान दौरा झाल्यानंतर ते रविवारी (21 मे) रोजी पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) या देशात दाखल झाले. दरम्यान, यावेळी जगभरात पंतप्रधान मोदींचा डंका वाजत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

अनेक देशांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. यात पापुआ न्यू गिनी आणि फिजी या देशांची भर पडली आहे. या दोन्ही देशांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान दिला आहे. फिजीने पंतप्रधान मोदींना 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी' हा सन्मान दिला आहे, तर यजमान देश पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान मोदींना 'द ग्रँड कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले आहे.

जपानमध्ये जी-7 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. यावेळी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी स्वतः पीएम मोदींचे विमानतळावर स्वागत केले. त्यांनी मोदींच्या पायाला स्पर्ष करुन आशिर्वादही घेतला. दरम्यान, आज त्यांनी तिसर्‍या इंडो-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (FIPIC) शिखर परिषदेत जेम्स मारापे आणि मोदींनी संयुक्तपणे यजमानपद स्विकारले.

चीनला प्रत्युत्तर देण्याची रणनीतीपंतप्रधान मोदी यांनी पीएम जेम्स मारापे यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. 2014 मध्ये मोदींच्या फिजी दौऱ्यादरम्यान FIPIC लाँच करण्यात आले होते. ही शिखर परिषद अशा वेळी होत आहे, जेव्हा चीन या भागात आपला लष्करी आणि राजनैतिक प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'तुमचा विकास भागीदार असल्याचा भारताला अभिमान आहे. 

मानवतावादी मदत असो किंवा तुमचा विकास असो, तुम्ही भारताला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहू शकता आणि त्यावर विश्वास ठेवू शकता. आम्ही आमचा अनुभव आणि क्षमता तुमच्यासोबत कोणत्याही संकोचशिवाय सामायिक करण्यास तयार आहोत. डिजिटल तंत्रज्ञान असो वा अवकाश तंत्रज्ञान, आरोग्य सुरक्षा असो वा अन्न सुरक्षा, हवामान बदल असो की इतर, आम्ही सर्व प्रकारे तुमच्यासोबत आहोत.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInternationalआंतरराष्ट्रीयJapanजपान