शेख हसीना यांच्या सत्तेतून हकालपट्टीनंतर बांगलादेशात झालेल्या १३ व्या ऐतिहासिक संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएनपीचे नेते तारिक रहमान यांचे मनापासून अभिनंदन केले असून, दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे तारिक रहमान यांचे अभिनंदन करताना त्यांनी म्हटले आहे की,"संसदीय निवडणुकीत बीएनपीला मिळालेला निर्णायक विजय हा बांगलादेशच्या जनतेचा तुमच्या नेतृत्वावरील अढळ विश्वासाचे प्रतीक आहे. या यशाबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो." पंतप्रधानांनी पुढे स्पष्ट केले की, भारत एका लोकशाहीवादी, प्रगतीशील आणि समावेशक बांगलादेशच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. उभय देशांमधील सामायिक विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि प्रादेशिक शांततेसाठी भारत नवीन सरकारसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
१७ वर्षांच्या निर्वासनानंतर सत्तेत पुनरागमन
तारिक रहमान आणि त्यांच्या बीएनपी पक्षासाठी हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तब्बल १७ वर्षांच्या राजकीय निर्वासनानंतर तारिक रहमान यांच्या पक्षाने मिळवलेली सत्ता ही दक्षिण आशियाई राजकारणातील एक मोठी उलथापालथ मानली जात आहे. शेख हसीना यांच्या सरकारनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत झालेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती, ज्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
भारत-बांगलादेश संबंधांचे नवीन वळण
पंतप्रधान मोदींच्या या अभिनंदन संदेशाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. भारताने स्पष्ट संकेत दिले आहेत की, बांगलादेशातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर भारत नवीन सरकारसोबत मजबूत आणि स्थिर द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करण्यास प्राधान्य देईल. व्यापार, सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांत दोन्ही देश पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : PM Modi congratulated Tarique Rahman on BNP's victory in Bangladesh, marking their return to power after 17 years. Modi expressed India's commitment to a democratic Bangladesh and eagerness to strengthen bilateral relations, focusing on trade, security, and regional peace, signaling a new chapter in India-Bangladesh ties.
Web Summary : पीएम मोदी ने बांग्लादेश में बीएनपी की जीत पर तारिक रहमान को बधाई दी, जो 17 साल बाद सत्ता में लौटे हैं। मोदी ने एक लोकतांत्रिक बांग्लादेश के प्रति भारत की प्रतिबद्धता व्यक्त की और व्यापार, सुरक्षा और क्षेत्रीय शांति पर ध्यान केंद्रित करते हुए द्विपक्षीय संबंधों को मजबूत करने की उत्सुकता जताई, जो भारत-बांग्लादेश संबंधों में एक नए अध्याय का संकेत है।