शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राच्या ज्या भूभागावर चंद्रयान-3 उतरले...; ग्रीसमधून PM मोदींचा जगाला खास संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 15:44 IST

ग्रीसमध्ये मोदींचं जबरदस्त स्वागत...

चंद्रयान-3 चे यश हे केवळ भारत अथवा भारतीय वैज्ञानिकांचेच यश नाही, तर हे संपूर्ण मानव जातीचे यश आहे.  संपूर्ण मानव जातीच्या भविष्यासाठी विज्ञानाचे अशा पद्धतीचे धाडस आणि यश फार महत्वाचे आहे. यातही चंद्रयान-3 चंद्राच्या ज्या पृष्ठभागावर उतरले आहे, मला वाटते की, यातून जे परिणाम बाहेर येतील ते विज्ञान जगत आणि संपूर्ण मानवजातीला चांद्रासंदर्भातील जिज्ञासा आणि भविष्यातील योजनांसाठी उयुक्त ठरतील, असे पंतप्रधा नरेद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते सध्या ग्रीस दौऱ्यावर आहेत. एथेन्समध्ये ग्रीक राष्ट्रपती कॅटरीना एन. यांनी चंद्रयान-3 च्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. यानंतर मोदी बोलत होते. 

ग्रीसमधून थेट इस्रोत जाणार पीएम मोदी -दक्षिण आफ्रिकेत 15वे ब्रिक्स शिखर सम्मेलनात भाग घेतल्यानंतर, पंतप्रधान मोदी ग्रीसमधील एथेन्स येथे पोहोचले आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, ते 26 ऑगस्ट रोजी थेट बेंगळुरू येथे पोहोचून, चंद्रयान-3 च्या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांचे अभिनंद करू शकतात. यानंतर ते दिल्लीला जातील. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश बनला आहे. दक्षिण आफ्रिकेतून चांद्रयान-3 चे लँडिंग लाईव्ह पाहणारे पंतप्रधान मोदी यांनी मिशन यशस्वी  होताच इस्रो प्रमुखांशी फोनवर संवाद साधला होता. 

ग्रीसमध्ये मोदींचं जबरदस्त स्वागत -ग्रीसमध्ये पोहोचताच ग्रीसचे परराष्ट्र मंत्री जॉर्ज गेरापेटेरिटिस यांनी विमानतळावर भव्य स्वागत केले. जवळपास ४ दशकांच्या प्रदीर्घ काळानंतर भारतीय पंतप्रधान ग्रीसला भेट देत आहेत. ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या खास निमंत्रणावरून नरेंद्र मोदी अथेन्सला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक विमानतळावर दाखल झाले होते.

नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर हजारो लोकांनी ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. नरेंद्र मोदींनीही तिथल्या लोकांची मोठ्या प्रेमाने भेट घेतली. ते लहान मुलांशी संवाद साधतानाही दिसले. ते अथेन्समधील हॉटेल ग्रॅन्डे ब्रेटाग्ने येथे थांबणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीChandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रो