शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पोलंडहून पंतप्रधान मोदींचा रशिया-युक्रेनला संदेश, १० तासांच्या ट्रेन प्रवासानंतर उद्या 'कीव'ला पोहोचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 23:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टस्क यांनी युक्रेन आणि मध्यपूर्वेतील संघर्षांसह परस्पर हिताच्या महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडहून ट्रेनने युक्रेनला जाणार आहेत. मोदींचा पोलंडहून प्रवास सुरू झाला आहे. १० तासांचा प्रवास केल्यानंतर ते शुक्रवारी पोलंडहून युक्रेनची राजधानी 'कीव' येथे पोहोचतील. पोलंडमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले . त्यांनी भारतीयांचीही भेट घेतली. वॉर्सा येथे पंतप्रधान मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. 

दोन महिन्यांपासून Sunita Williams अंतराळात अडकल्या; गंभीर आजारांचा धोका वाढला...

पोलंडमध्ये रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा संघर्ष आपल्यासाठी चिंतेचा विषय असून युद्धभूमीवर कोणतीही समस्या सोडवता येत नाही. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी ते 'स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप'च्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण, सांस्कृतिक सहकार्य यासह द्विपक्षीय भागीदारीच्या विविध पैलूंवर त्यांनी व्यापक चर्चा केली.

अन्न प्रक्रिया, शहरी पायाभूत सुविधा, पाणी, इलेक्ट्रिक वाहने, ग्रीन हायड्रोजन, एआय, खाणकाम यासारख्या क्षेत्रात आर्थिक आणि व्यावसायिक सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. पीएम मोदी आणि डोनाल्ड टस्क यांनी लोक-लोकांमधील संबंध आणि सांस्कृतिक संबंध अधिक सुधारण्यावर भर दिला. या संदर्भात त्यांनी जामनगरचे महाराज आणि कोल्हापूरचे राजघराणे यांच्या दातृत्वाच्या जोरावर दोन्ही देशांमध्ये प्रस्थापित झालेल्या संबंधांचाही उल्लेख केला.

पंतप्रधान मोदींनी पोलंडमध्ये राष्ट्रपतींची भेट घेतली. बेलवेडेरे पॅलेसमधील बैठकीनंतर मोदी यांच्या सोशल मिडिया प्लॅटफ़र्म  इंस्टाग्रामवर पोस्ट केले, 'वॉर्सा येथील राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांना भेटून आनंद झाला. भारत-पोलंड संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर आम्ही चर्चा केली. पोलंडसोबतच्या सौहार्दपूर्ण संबंधांना भारत खूप महत्त्व देतो. आगामी काळात आमच्या देशांमधील व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर पोस्ट केले की, दोन्ही नेत्यांमध्ये संभाषण झाले, यामध्ये विविध क्षेत्रात भारत-पोलंड भागीदारी मजबूत करण्यावर भर देण्यात आला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी