शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल निवडणुकीत नेतन्याहूंना मोदींचा आधार, पोस्टरमध्ये दोघांचे हातात हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 09:12 IST

नेतन्याहूंच्या लिकुड पक्षानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न चालवला आहे.

तेल अवीवः इस्रायलमध्ये 17 सप्टेंबरला पुन्हा निवडणूक होत असून, त्यासाठी बेंजामिन नेतन्याहूंनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. नेतन्याहूंच्या लिकुड पक्षानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न चालवला आहे. लिकुड पक्षाच्या जाहिरातबाजीत नेतन्याहूंबरोबर मोदी पोस्टरमध्ये झळकतायत. तर दुसरीकडे इस्रायलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर नेतन्याहू असलेले पोस्टरही जागोजागी लावण्यात आले आहेत. तेल अवीवच्या किंग जॉर्ज रस्त्यावर लिकुड पक्षाचं मुख्यालय आहे, तिथे या तिन्ही आंतरराष्ट्रीय नेत्यांबरोबर नेतन्याहूंची जवळीक असल्याचं दाखवण्याचा जाहिरातीतून प्रयत्न केला आहे.नेतन्याहू यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्यांबरोबर असलेल्या घनिष्ठ संबंधांचा निवडणुकीत वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक काळ इस्रायलचे पंतप्रधान राहिलेल्या नेतन्याहू यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसल्याची चर्चा आहे. त्याच्याच कार्यकाळात भारत आणि इस्रायलमध्ये आर्थिक, लष्कर आणि राजकीय संबंध वेगानं वृद्धिंगत झाले आहेत. मोदींच्या 2019च्या विजयानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून शुभेच्छा देणारे ते पहिले नेते आहेत. नेतन्याहू निवडणुकीच्या 8 दिवस अगोदरच 9 सप्टेंबरला भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. नेतन्याहूंचा वाईट काळ सुरू असून, मोदींबरोबर फोटो खेचल्यानं आपल्याला फायदा होईल, अशी त्यांना आशा आहे, इस्रायलचे लेखक योसी वर्टर यांनी यासंदर्भात एक लेखही लिहिली आहे.  बहुमत सिद्ध करू न शकल्यानं पुन्हा निवडणूकइस्रायलमध्ये यंदाच्या मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तरीही गेल्या सहा आठवड्यांत ते अन्य पक्षांसोबत आघाडी करण्यात अपयशी ठरल्याने बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. यामुळे खासदारांनी सरकार स्थापन करण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन संसद भंग करण्याचा प्रस्ताव संमत केला. आता इस्रायलमध्ये 17 सप्टेंबरला पुन्हा निवडणूक होत आहे. इस्रायलच्या इतिहासात आजपर्यंत कधीही एकाच पक्षाला बहुमत मिळालेले नाही. मात्र, जास्त जागा जिंकलेला पक्ष इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करत होता. यामुळे इस्रायलमध्ये ही पहिलीच वेळ आहे की पंतप्रधान आघाडी करण्यात अपयशी ठरले आहेत. नेतन्याहू यांनी दक्षिणपंथी पक्षांसोबत गेल्या सहा आठवड्यात अनेकदा वाटाघाटी, चर्चा केल्या. मात्र, त्यात यश न आल्याने शेवटी संसद भंगाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. उपस्थित 120 पैकी 119 खासदारांनी मतदानात भाग घेतली. यामध्ये 74 खासदारांनी संसद भंग करण्याच्या बाजूने आणि 45 जणांनी विरोधात मतदान केले होते. 

टॅग्स :Israelइस्रायल