शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी इस्रायलमध्ये, नेतन्याहू यांच्या विधानाने मुस्लीम देशांचे धाबे दणाणले; पाकिस्तानच्याही पोटात गोळा! पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 21:46 IST

"ऑपरेशन सिंदूर'मध्ये इस्रायलने पाकिस्तानविरुद्ध डिफेंस स्ट्रॅटजीच्या स्वरुपात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा दावाही डॉनने केला आहे."

मध्य पूर्वेवर युद्धाचे ढग दाटले असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून (२५ फेब्रुवारी) दोन दिवसांच्या ऐतिहासिक इस्रायल दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याकडे, संपूर्ण जगाचे, विशेषतः अरब राष्ट्रांचे लक्ष लागले आहे. इस्रायलमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते, "आपण द्विपक्षीय चर्चा आणि भारत-इस्रायल मैत्री अधिक घट्ट करणाऱ्या अर्थपूर्ण निकालांची वाट पाहत आहोत."

पाकिस्तानच्या पोटात गोळा -मोदींचा हा दौरा पाकिस्तानसाठी 'धोक्याची घंटा' असल्याचे पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने म्हटले आहे, १९९२ मध्ये संबंध बहाल झाल्यानंतर मोदींच्या काळात दोन्ही देश अधिक जवळ आले आहेत. "ऑपरेशन सिंदूर'मध्ये इस्रायलने पाकिस्तानविरुद्ध डिफेंस स्ट्रॅटजीच्या स्वरुपात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा दावाही डॉनने केला आहे." जिओ न्यूजने तर या दौऱ्यावर विशेष शो करत पाकिस्तानच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे नाव होते, 'पीएम मोदी का इजरायल दौरा पाकिस्तान के लिए खतरे की घंटी.'

का दणाणलेय इस्लामिक देशांचे धाबे? -पंतप्रधान मोदींच्या इस्रायल भेटीपूर्वी, नेतान्याहू यांनी हेक्सागन अलायन्सचा उल्लेख केला होता, यावर पाकिस्तानी माध्यमांनी चिंता व्यक्त केली आहे. शिया आणि सुन्नी यांना धोकादायक म्हणत, नेतान्याहू यांनी भारत, ग्रीस, सायप्रस आणि काही अरब, आशियाई आणि आफ्रिकन देशांसह एक गट स्थापन करण्यासंदर्भात भाष्य केले होते. पाकिस्तानच्या संसदेने मंगळवारी (२४ फेब्रुवारी २०२६) नेतन्याहू यांच्या या विधानाविरुद्ध ठरावही मंजूर केला आहे.

'मिडल ईस्ट मॉनिटर'ने म्हटले आहे, २०१८ पासून भारताने इस्रायल आणि पॅलेस्टाईन संबंधांना वेगळे करून बघण्यास सुरुवात केली आहे. भारत पॅलेस्टाईनला पाठिंबा देत असला तरी, इस्रायलसोबतची त्याची भागीदारीही अधिक बळकट करत आहे. 'अल जझीरा'ने म्हटले आहे, भारत चीननंतर आशियातील इस्रायलचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. तसेच दोन्ही देश इस्लामी दहशतवादाला समान धोका मानतात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायल