शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

PM Modi Bangladesh Visit : PM मोदी बांगलादेशात पोहोचले, शेख हसीनांनी केलं स्वागत; गार्ड ऑफ ऑनरनेही करण्यात आलं सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 11:27 IST

या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान मोदी 27 मार्चला बांगलादेशातील गोपालगंज येथे मतुआ समाजाचे धर्मगुरू हरिचंद्र ठाकूर यांच्या जन्‍मस्‍थळाला भेट देणार आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्वाची...

ढाका - पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशमध्ये पोहोचले आहेत. ते येथे अनेक कार्यक्रमांत भाग घेणार आहेत. ढाका येथील विमान तळावर पोहोचताच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. येथे मोदींना गार्ड ऑफ ऑनरनेही सन्मानित करण्यात आले. (PM Modi Bangladesh Visit PM Sheikh Hasina welcomes PM Narendra Modi at Dhaka airport)

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर असून कोरोना काळातील हा त्यांचा पहिलाच परदेश दौरा आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमासाठी मोदी मुख्य अतिथी म्हणून बांगलादेशात पोहोचले आहेत. या दोन दिवसांत ते इतरही अनेक कार्यक्रमात भाग घेतली.

मतुआ समाजाचे धर्मगुरू हरिचंद्र ठाकूर यांच्या जन्‍मस्‍थळाला भेट - या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान मोदी 27 मार्चला बांगलादेशातील गोपालगंज येथे मतुआ समाजाचे धर्मगुरू हरिचंद्र ठाकूर यांच्या जन्‍मस्‍थळाला तसेच इतर काही तीर्थ स्थळांना भेट देणार आहेत. या स्थळांना भेट देणारे पंतप्रधान मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान असतील. मोदींच्या या भेटींना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्व आहे. कारण पश्चिम बंगालमधील अनेक विधानसभा क्षेत्रांत मतुआ समाजेचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. 

भारताने बांगलादेशला कोरोना लसीचे 90 लाख डोस दिले -भारताचे बांगलादेशसोबत असणारे संबंध मजबूत आणि सौदार्हपूर्ण आहेत. नेबरहुड फर्स्ट या धोरणातंर्गत भारताने बांगलादेशला वेळोवेळी मदत केली आहे. कोरोना संकटाच्या काळातही भारताने बांगलादेशला मोठी मदत केली आहे. भारताने बांगलादेशला कोरोना लसीचे 90 लाख डोस दिले आहेत. ही मदत इतर कोणत्याही देशाला दिलेल्या मदतीपेक्षा अधिक आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी आणि बांगलादेशच्या ढाका या दोन शहरांदरम्यानच्या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

गेल्या वर्षीच ठरला होता दौरा -गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासोबत व्हर्च्युअली मीटिंग केली होती. त्यावेळीच या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. जानेवारी 2021मध्ये बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमेन भारत भेटीवर आले होते. त्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे बांगलादेश दौऱ्यावर गेले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी