शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

किम जोंग उन यांच्या 'त्या' फोटोची चर्चा, असं काय आहे त्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 08:10 IST

एका फोटोची चर्चा जगभरात सुरु आहे. हा फोटो आहे किम जोंग उन आणि त्यांच्या मुलीचा.

एक फोटो खूप काही सांगतो. फोटो बघताना लोक भूतकाळात जातात, आठवणींमध्ये रमतात. फोटोच्या निमित्तानं घडून गेलेला प्रसंग/ घटना  पुन्हा जगून पाहतात; पण फोटोची ताकद फक्त भूतकाळाचा चेहरा दाखवण्याइतपतच मर्यादित नाही. भविष्यासंबंधीच्या अनेक शक्यताही तो वर्तवतो. अशाच एका फोटोची चर्चा जगभरात सुरु आहे. हा फोटो आहे किम जोंग उन आणि त्यांच्या मुलीचा. असं काय आहे त्या फोटोत?

आतापर्यंत किम जोंग उन आपल्या कुटुंबासमवेत सार्वजनिक ठिकाणी दिसणं तसं फारच दुर्मिळ. म्हणूनच मुलीसोबतच्या त्यांच्या फोटोबद्दल जगभरात चर्चा सुरू आहे. हा फोटो आहे उत्तर कोरियाने Hwasong-17ICBM या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण केलं त्यावेळेचा. या प्रक्षेपणाला किम जोंग उन आपल्या मुलीला घेऊन आले होते. तिचं नाव अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केलेलं नाही. कारण ते त्यांना माहीतच नाही. 

किम जोंग उन यांच्या कुटुंबाची माहिती त्यांचे आजोबा किम II संग, वडील किम जोंग इल आणि त्यांची बहीण किम यो जोंग एवढ्यापुरतीच सीमित आहे. किम जोंग उन यांना किती मुलं आहेत, त्यात मुलगे किती, मुली किती हेदेखील उत्तर कोरियातल्या माध्यमांना खात्रीशीररित्या सांगता येत नाही. काही प्रसिद्धीमाध्यमांच्या मते ९ ते १० वर्षे वयाची जु ए ही किम जोंग उन यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी आहे. तीच त्यांची सर्वात लाडकी मुलगी असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

जु ए ही क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणप्रसंगी उपस्थित होती, याचे अनेक अर्थ काढले जात आहेत..१. आंतरखंडीय क्षेपणास्त्र प्रक्षेपण हा लष्कर आणि उत्तर कोरियाच्या वर्चस्वाचा विषय. अशा प्रसंगी किम जोंग उन यांनी आपल्या मुलीसोबत असणं याचा अर्थ ही मुलगीच किम जोंग उन यांची उत्तराधिकारी असेल.२.  जगभरात ज्याचा चेहरा हा केवळ क्रूर हुकूमशहा याच अर्थानं पाहिला जातो, त्या चेहऱ्यामागे एक प्रेमळ बापही आहे, हे जगाला सांगण्याचा हा प्रयत्न असावा.३. उत्तर कोरियाची शस्त्रसज्जता, क्षेपणास्त्र चाचण्या या फक्त संहारासाठी नसून त्या पुढच्या पिढीच्या सुरक्षेसाठीही आहेत, हा संदेश उत्तर कोरियाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि इतर देशांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असावा.४. मुलीला सोबत आणून एका महत्त्वाच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाकडे अमेरिकेचे जाणारे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा किम जोंग उन यांचा हा प्रयत्न असू शकतो. ५. अण्वस्त्रदृष्ट्या उत्तर कोरियाला सज्ज ठेवण्याचा वारसा पुढच्या पिढीकडेही असाच सोपवला जाणार, उत्तर कोरियाचा स्वभाव हा असाच राहणार हे सांगण्यासाठी किम जोंग उन हे आपल्या मुलीला घेऊन आले असावेत..

चेआँग सेआँग चँग या विश्लेषकाच्या मते किम जोंग उन यांना मुलगा असला तरी त्याच्यात नेतृत्वक्षमतेचा अभाव असेल तर ते  त्याचा विचार उत्तराधिकारी म्हणून करणार नाहीत. आपल्या मुलीला क्षेपणास्त्र प्रक्षेपणाप्रसंगी घेऊन जाणं म्हणजे तिला आपला उत्तराधिकारी करण्याच्या प्रशिक्षणाचाच हा एक भाग असावा. 

उत्तर कोरियातील महिला नेतृत्वावर लिखाण करणाऱ्या चुन सू जीन यांच्या मते उत्तर कोरियात किम जोंग उन यांच्या मुलीचे शासक म्हणून स्वागत होण्याची शक्यता अगदीच शून्य आहे; पण काही राजकीय तज्ज्ञांच्या मते उत्तर कोरियात पितृसत्ताक पद्धती असली तरी केवळ लिंगाधारित दुजाभाव करून स्त्रीला सत्ता नाकारली जाऊ शकत नाही. 

आता किम जोंग उन यांनी वयाची चाळिशी ओलांडली असून त्यांनी आपला उत्तराधिकारी कोण याचा विचार पक्का करण्याची वेळ आली आहे. जु ए सोबतचा फोटो हा त्याचाच एक भाग असू शकतो असं  नाॅर्थ कोरिया लीडरशीप वाॅचच्या संचालक मिशेल मॅडन म्हणतात. रचेल मिनयंग यांच्या मते किम जोंग उन हे आपले आजोबा आणि वडिलांपेक्षा वेगळा विचार करणारे आहेत. त्यांच्या प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी महिलांना नेमलं आहे. त्यामुळे किम जोंग उन हे नक्कीच आपल्या मुलीचा उत्तराधिकारी म्हणून विचार करत असतील. मात्र किम जोंग उन यांचा इतिहास पाहता त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे जगाला शेवटपर्यंत कळू शकणार नाही!

किम जाेंग यांच्या घराण्याचा ‘इतिहास’!राजकीय विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या मते, किम जोंग उनला तीन मुलं आहेत. त्यातली जु ए ही दुसऱ्या क्रमांकाची मुलगी आहे. तरीही आपला उत्तराधिकारी म्हणून किम जोंग उन तिचा विचार करत असतील तर त्यांचा इतिहास पाहता ते योग्य आहे. कारण किम जोंग उन यांच्या वडिलांनाही अनेक मुलं होती; पण त्यांना किम जोंग उन यांच्यातच शासन करण्याची क्षमता जाणवली आणि त्यांनी किम जोंग उनला आपला उत्तराधिकारी नेमला.

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उन