शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार फूट उंचीवर विमानाचे इंजिन तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:42 IST

फ्रान्समधून ५०० प्रवाशांना घेऊन लॉस एंजिलिसला निघालेल्या एअर फ्रान्सच्या ए ३८० सुपर जंबो विमानाचे इंजिन ३५,००० फूट उंचीवर तुटल्याने पेच निर्माण झाला

पॅरिस : फ्रान्समधून ५०० प्रवाशांना घेऊन लॉस एंजिलिसला निघालेल्या एअर फ्रान्सच्या ए ३८० सुपर जंबो विमानाचे इंजिन ३५,००० फूट उंचीवर तुटल्याने पेच निर्माण झाला, पण पायलटने कॅनडात या विमानाचे सुरक्षित लँडिंग केल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.हे विमान ४९६ प्रवासी आणि चालक दलाचे २४ सदस्य यांना घेऊन निघाले होते. लॉस एंजिलिसकडे जाण्यासाठी या विमानाने उड्डाण केले. मात्र, काही वेळानंतर विमान जोरात हलू लागले, असे प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे विमानाचा मोठा आवाजही येऊ लागला. सोशल मीडियात या विमानाचे फोटो पोस्ट करण्यात आले असून, यात विमानाच्या बाहेरील भागाची झालेली मोडतोड दिसत आहे.एअर फ्रान्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही घटना घडली, तेव्हा विमान ग्रीनलँडच्या वर होते. आंतरराष्ट्रीय वेळेनुसार, दुपारी ३.४२ वाजता पूर्व कॅनडात सैन्य विमानतळावर सुरक्षितरीत्या हे विमान उतरले. विमानातील सर्व ५२० व्यक्ती सुरक्षित आहेत. घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. बहुधा पंख्याने काम न केल्याने अशी परिस्थिती उद्भवली असावी, असे मत माजी एअरक्राफ्ट मॅकॅनिक डेव्हिड रेहमर यांनी व्यक्त केले आहे.