शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

'राय' चक्रीवादळाचा तडाखा! फिलीपिन्समध्ये 208 लोकांचा मृत्यू; शेकडो जखमी, लाखो लोक बेघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 14:09 IST

Philippines Super Typhoon Rai : सर्वात शक्तिशाली वादळ रायने फिलीपिन्सचं खूप मोठं नुकसान केलं आहे.

फिलीपिन्सला 'राय' चक्रीवादळाचा (Philippines Super Typhoon Rai) तडाखा बसला आहे. या वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ रायने फिलीपिन्सचं खूप मोठं नुकसान केलं आहे. यामध्ये  आतापर्यंत 208 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 239 लोक जखमी झाले असून 52 बेपत्ता आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ 'राय'ने द्वीपसमूहाच्या दक्षिण आणि मध्य भाग उद्ध्वस्त केला आहे. गुरुवारी वादळाचा तडाखा बसल्यानंतर तीन लाखांहून अधिक लोकांना आपलं घरं सोडावं लागलं आहे. समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्ट्स रिकामी करण्यात आले आहेत. फिलीपिन्स रेड क्रॉसने किनारी भाग पूर्णपणे ओसाड झाला आहे असं म्हटलं आहे. 

रेड क्रॉसचे अध्यक्ष रिचर्ड गॉर्डन यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरे, रुग्णालये, शाळा आणि रहिवाशी इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे घरांचे छप्पर तुटले आहे, झाडे उन्मळून पडली आहेत. काँक्रीटचे विजेचे खांब कोसळले, लाकडी घरे तुटली आणि गावांमध्ये पूर आला. राय चक्रीवादळाची तुलना 2013 मधील हैयान चक्रीवादळाशी केली जात आहे. फिलीपिन्समधील योलांडा नावाचे हैयान हे देशातील सर्वात शक्तिशाली आणि धोकादायक वादळ मानले जाते. ज्यामध्ये 7,300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तसेच अनेक जण बेपत्ता झाले होते. 

बेटांवरही मोठ्या प्रमाणावर विनाश

प्रांतीय गव्हर्नर आर्थर याप यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर सांगितलं की, यावेळी सर्वाधिक प्रभावित बेटांपैकी एक म्हणजे बोहोल. जो समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो. येथे किमान 74 लोकांचा मृत्यू झाला आहे. सिरगाव, दिनागट आणि मिंडानाओ या बेटांवरही मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आहे. वादळामुळे ताशी 195 किलोमीटर वेगानं वाऱ्याचा वेग आला. प्रांतीय माहिती अधिकारी जेफ्री क्रिसोस्टोमो यांनी रविवारी एएफपीला सांगितलं की, दिनागट बेटांवर किमान 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दळणवळण सेवा पूर्णपणे ठप्प

सिरगाओ बेटावरील जनरल लुना या लोकप्रिय पर्यटन शहरामध्येही परिस्थिती वाईट आहे. ख्रिसमसचा आनंद घेण्यासाठी लोक येथे येतात, मात्र आता तिथे अन्नपाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. अनेक भागात दळणवळण सेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे वादळामुळे झालेल्या एकूण नुकसानीचा अंदाज घेणे आपत्ती यंत्रणांना कठीण जात आहे. वीज पुरवठा खंडीत झाला आहे. घरातील वीज गेली आहे. शोध आणि बचावासाठी हजारो सैन्य, पोलीस, तटरक्षक दल आणि अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे. अन्न, पाणी आणि वैद्यकीय साहित्य घेऊन जाणारी तटरक्षक दल आणि नौदलाची जहाजे रवाना करण्यात आली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.