शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
4
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
5
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
6
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
7
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
8
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
9
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
10
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
12
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
13
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
14
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
15
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
16
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
17
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
18
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
19
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
20
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध

येत्या ८ वर्षात नष्ट होतील पेट्रोल कार

By admin | Updated: May 18, 2017 15:08 IST

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या अर्थतज्ज्ञांचा अभ्यास, चारचाकी गाड्यांचं भवितव्य धोक्यात

- निशांत महाजन

आठ वर्षानंतर जगाच्या पाठीवर कुठंही पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या, डिझेलवर धावणाऱ्या कार, बस, ट्रक विकल्या जाणार नाहीत. ट्रान्सपोर्टेशनचं पूर्ण मार्केटच बदलून जाईल आणि लोक इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्या वापरतील. पेट्रोल-डिझेलच्या किमती कोसळतील आणि पेट्रोलिअम उद्योगानं जे राज्य जगावर केलं ते ही संपेल असा भविष्यकालीन अभ्यासपूर्ण दावा स्टॅण्फोर्ड विद्यापीठातील अर्थतज्ज्ञ टोनी सेबा यांनी केला आहे. ‘रिथिंकिंग ट्रान्सपोर्टेशन २०२०-२०३० हा अभ्यास त्यांनी नुकताच प्रसिद्ध केला. आणि तो अभ्यास वाहन उद्योग, पेट्रोल उद्योग, पर्यावरण ते अर्थव्यवस्थांमधील बदल अभ्यासणारे तज्ज्ञ यांसाऱ्या जगात तो अभ्यास चर्चेचा विषय ठरलेला आहे.टोनी सेबा यांचं म्हणणं आहे की, येत्या काळात लोक गाड्या चालवणंच बंद करतील. सेल्फ ड्राईव्ह इलेक्ट्रिक व्हेइकल्सना ( इव्ही) मागणी वाढेल. येत्या काळात ही इलेक्ट्रिक व्हेइकल्स वापरणं सध्या वापरत असलेल्या पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांपेक्षा १० पट स्वस्त पडेल.

 

जे लोक फार नॉस्टेल्जिक असतील, आठवणीत रमत बसतील तेच फक्त सवय म्हणून कार घेवून ठेवतील. जुनी कार दारात उभी करतील. मात्र बाकीचे काळासोबत नवीन वाहन स्वीकारतील. यापुढच्या काळात पेट्रोल पंप सापडणं, स्पेअर पार्ट मिळणं हेच अवघड होवून जाईल. कारण पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्याच कमी होतील. कार डिलर ही गोष्ट २०२४ पर्यंत संपूनच जाईल.हेच नाही तर अनेक शहरात ड्रायव्हर म्हणून गाडी चालवण्याची मानवाला परवानगी देणंच बंद होवून जाईल. कारण मनुष्य वाहनचालक हा किती धोकादायक गाड्या चालवतो, किती अपघात होतात हे जग पाहतं आहेच. कदाचित उपनगरातच फक्त गाड्या चालतील. अनेक गाड्यांची विल्हेवाट लावली जाईल. सेकंड हॅण्ड गाड्यांचे भाव तर उतरतीलच. पण काळ असाही येईल की तुम्हाला तुमची गाडी विकायला पैसे द्यावे लागतील.आॅईल आणि वाहन उद्योगाला याचा मोठा तडाखा बसेल असा त्यांचा अभ्यास आहे. क्रूड आॅईलच्या किमती पडतील आणि २५ युएस डॉलर प्रती डॉलर इतक्या त्या खाली येतील.जनरेशन नेक्स्टची कार ही कम्प्युटर आॅन व्हील या तत्वानं चालेल. आॅटो कार, इलेक्ट्रिक कार चा जमान येईल असा हा अभ्यास सांगतो. आणि जगभरातल्या उद्योगांवर याचा काय परिणाम होईल याचा तपशिलही देतो. सामान्य माणसाच्या प्रवासात बदल होवू घातला आहे, हे मात्र हा अभ्यास वारंवार अधोरेखित करतो.

अधिक माहितीसाठी प्रो.टोनी यांचा हा एक व्हिडीओ इथं पाहता येईल