शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव कुत्र्याने आधी मालकाला मारले, नंतर नातेवाईकालाही आपले दोन्ही पाय गमवावे लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 09:37 IST

मालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मेहुण्याने कुत्र्याला आपल्या सोबत नेले होते, मात्र हॅरिसच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच कुत्र्याने त्याच्या मेव्हण्या मार्क डेलाही आपला बळी बनवले.

लंडन :कुत्रा हा माणसांचा सर्वात निष्ठावान प्राणी मानला जातो, जो घराचे नेहमी रक्षण करतो. पण ब्रिटनमधून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक पाळीव कुत्र्या त्याच्या मालकाच्या मृत्यूचे कारण बनला आणि त्यानंतर मालकाच्या नातेवाईकालाही कुत्रा चावल्यामुळे दोन्ही पाय गमवावे लागले.

मालकावर प्राणघातक हल्ला

'द सन'च्या बातमीनुसार, कुत्र्याने चावा घेतल्याने त्याचा मालक बॅरी हॅरिसचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांच्या शरीरात संसर्गही पसरला होता. हॅरिसने हा कुत्रा मृत्यूपूर्वी दीड लाख रुपयांना विकत घेतला होता. 

पाय कापावे लागलेमालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मेहुण्याने या कुत्र्याला त्याच्यासोबत नेले. पण, हॅरिसच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच त्या कुत्र्याने त्याच्या मेव्हण्या मार्क डेलावर हल्ला केला. हल्ल्यानंतर मार्कच्या शरीरात संसर्ग इतका वाढला होता की, डॉक्टरांना ऑपरेशन करुन त्याचे दोन्ही पाय आणि डाव्या हाताची बोटेही कापावी लागली.

दुसरा मालकही अडचणीत आला

कुत्रा चावल्यानंतर मार्कची प्रकृती खूपच वाईट झाली होती. डॉक्टरांनी सांगितले की कुत्रा त्याच्या दुखापतीसाठी 100% जबाबदार आहे. उपचारादरम्यान, मार्कचे संपूर्ण शरीर थंड झाले होते आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी, त्याच्या अवयवांनी काम करणे थांबवल्यामुळे त्याला जबरदस्तीने 10 दिवस कोमात ठेवावे लागले. शेवटी, शस्त्रक्रिया करून त्याचे दोन्ही पाय आणि बोटे कापावी लागली. हॉस्पिटलमध्ये 82 दिवस घालवून मार्क घरी परतला असून त्याला प्रोस्थेटिक पायांच्या मदतीने पुढे चालता येईल अशी आशा आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सdogकुत्रा