शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष गार्सिया यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 04:09 IST

पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष अ‍ॅलन गार्सिया (६९) यांनी स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.

लिमा : पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष अ‍ॅलन गार्सिया (६९) यांनी स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. एका लाचखोरीच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.प्रभावशाली वक्ते असलेले गार्सिया हे दोन वेळा पेरूचे राष्ट्राध्यक्ष झाले. आधी ते आक्रमक डावे म्हणून ओळखले जात होते. नंतर त्यांनी विदेशी गुंतवणूक आणि मुक्त व्यापाराचा पुरस्कार केला. अलीकडील काही वर्षांत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. ते त्यांनी फेटाळूनही लावले होते. तथापि, एका न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश दिल्याने त्यांनी जीवन यात्रा संपविली, असे सूत्रांनी सांगितले.ब्राझिलची बांधकाम कंपनी ‘ओडेब्रेश्ट’ने लॅटिन अमेरिकेत घडवून आणलेल्या सर्वांत मोठ्या लाच कांडात गार्सिया यांचे नाव आले आहे. कंत्राटे मिळविण्यासाठी कंपनीने राजकीय नेत्यांना लाच दिल्याचा आरोप आहे.या प्रकरणात बुधवारी पेरूच्या एका न्यायालयाने नऊ जणांच्या अटकेचे आदेश दिले होते. त्यात गार्सिया यांचाही समावेश आहे. सूत्रांनी सांगितले की, ओडेब्रश्ट लाच कांडात अटक होऊ नये, यासाठी गार्सिया यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)राष्ट्रवादी विचारांचा नेतागार्सिया यांच्या पक्षाने त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या कॅसिमिरो उल्लोआ हॉस्पिटलबाहेर त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली. यावेळी रुग्णालयाबाहेर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णालयात त्यांची हृदयक्रिया तीन वेळा बंद पडली होती. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.तथापि, ते वाचू शकले नाहीत, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. पेरूचे राष्ट्राध्यक्ष मार्टिन विझकारा यांनी गार्सिया यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.गार्सिया यांनी १९८५ ते १९९0 या काळात राष्ट्रवादी विचारांचा नेता म्हणून सत्ता सांभाळली होती. २00६ साली त्यांनी उदारमतवादी धोरणांचा पुरस्कार करून पुन्हा पाच वर्षांसाठी सत्ता मिळविली.