शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणमधील भूस्खलनात २ हजारांवर लोकांचा बळी

By admin | Updated: May 5, 2014 14:52 IST

ईशान्य अफगाणिस्तानात झालेल्या प्रचंड भूस्खलनात २ हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असून, माती व दगडाच्या लाटेखाली सापडलेले लोक ३0 फुटांपेक्षा जास्त खोलीवर दडपले गेले आहेत.

काबूल : ईशान्य अफगाणिस्तानात झालेल्या प्रचंड भूस्खलनात २ हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असून, माती व दगडाच्या लाटेखाली सापडलेले लोक ३0 फुटांपेक्षा जास्त खोलीवर दडपले गेले आहेत. बादकशान प्रांतातील अबी बराक हे गाव सामूहिक दफनभूमी म्हणून जाहीर करण्याचा विचार अधिकारी करीत आहेत. चिखलाच्या लाटेखाली दबलेले लोक जिवंत असण्याची शक्यता नाही, त्यामुळे मदत मोहीम थांबविली जाईल, असे बादकशान येथील संसदेचे सदस्य मोहंमद झायकेरिया सावदा यांनी घटनास्थळाला शनिवारी दिलेल्या भेटीत सांगितले. अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांनी रविवारी राष्ट्रीय शोक जाहीर केला असून, सर्व ध्वज अध्र्यावर उतरविण्यात आले आहेत. भूस्खलनाच्या दुर्घटनेतील नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करझाई यांनी केले असून, ही मानवी दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे. अबी बराक हे गाव पूर्णपणे चिखलाच्या लाटेखाली गाडले गेले आहे. गावातील कुटुंबेच्या कुटुंबे दरडीखाली गाडली गेली असून, या ढिगार्‍याखालून कोणाला बाहेर काढणे कठीण झाले आहे. अर्धाअधिक डोंगरच अबी बराक गावावर कोसळला, त्यामुळे त्याखाली गाडल्या गेलेल्यांचे मृतदेह बाहेर काढणेही कठीण आहे. डोंगर कोसळल्यामुळे नवीनच लग्न झालेल्या एका दाम्पत्याचे घर गाडले गेले, त्यांच्या मदतीसाठी शेजारी धावत असता दुसरी दरड कोसळली व सगळेचजण गाडले गेले. एका घरात लग्नाचा कार्यक्रम सुरू होता, ते घरही या आपत्तीत नाहीसे झाले. (वृत्तसंस्था)