शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीनं समुद्रात उड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 19:47 IST

इंडोनेशियात बोटीतील कर्मचार्‍यांमुळे आपल्यालाही कोरोना होईल या भीतीनं शेवटी अनेक प्रवाशांनी थेट समुद्रातच उड्या घेतल्या.

ठळक मुद्देकोरोना तर अनेकांचा जीव घेतोच आहे, पण त्याची भीतीही अनेकांचं आयुष्य संपवतं आहे!.

लोकमत न्यूज नेटवर्कसध्याच्या काळात प्रत्येकाला आपलं घर प्यारं झालं आहे. स्वत:ची प्रगती व्हावी, विकास व्हावा म्हणून अनेकांनी आपापला प्रदेश सोडून कामधंद्यासाठी दुसरीकडे सहारा शोधला होता, पण कोरोनाच्या महामारीनं सगळ्यांनाच देशोधडीला लावलं आणि आपलं किडुकमिडुक आवरून त्यांना पुन्हा आपापल्या घरी जाण्यास भाग पाडलं. स्थलांतरितांसाठी तर हा अक्षरश: जीवनमरणाचा प्रo्न. त्यामुळे ठिकठिकाणच्या स्थलांतरितांनी झपाट्यानं आपल्या देशाचा, गावाचा रस्ता धरला.इंडोनेशिया हा एक मोठा द्वीपसमूह. कोरोनाचं संकट वाढायला लागलं तसं, त्यांचा शेजारी देश मलेशियानंही आपल्याकडे लॉकडाऊन केलं. हजारो कामगार बेकार झाले. त्यामुळे मलेशियात असलेल्या इंडोनेशियन नागरिकांनीही आपल्या मायदेशी जाण्याचं ठरवलं. फेरी बोटींनी काही जण आपल्या देशात पोहोचलेही. पण हा प्रकार इंडोनेशिया प्रशासनाला कळल्यावर तेही सज्ज झाले. त्यात एका बोटीतील तीन क्रू मेंबर्सना कोरोना झालेला असल्याची माहिती त्यांना मिळाली. या बोटीत अडीचशेवर प्रवासी होते. तोपर्यंत प्रवाशांनाही ही माहिती नव्हती. इंडोनेशियन प्रशासनानं किनार्‍याच्या अलीकडेच ही बोट थोपवली. आपल्याला आता परत फिरावं लागेल, किनार्‍यावर उतरू देणार नाहीत आणि बोटीतील कर्मचार्‍यांमुळे आपल्यालाही कोरोना होईल या भीतीनं शेवटी अनेक प्रवाशांनी थेट समुद्रातच उड्या घेतल्या. काहींनी बोटीत होती तेवढी लाइफ जॅकेट्स उचलली तर काहींनी तशाच उड्या  मारल्या. त्यातले काही जण किनार्‍याला लागले, तर काही जणांचा अद्याप पत्ता नाही. कोरोना तर अनेकांचा जीव घेतोच आहे, पण त्याची भीतीही अनेकांचं आयुष्य संपवतं आहे!.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या