शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'या' देशात चक्क तीन राष्ट्राध्यक्ष निवडले जातात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 13:30 IST

राजकीय गोंधळ असणाऱ्या या देशाची लोकसंख्या केवळ ३५ लाख इतकीच आहे. त्यातील ३३ लाख लोकांना मतदानाचा अधिकार आहे. या गुंतागुतीच्या रचनेमुळे प्रत्येकाची परवानगी मिळवता मिळवता एखादा निर्णय घेण्यास भरपूर वेळ जातो.

मुंबई- अरे काय, आम्हाला एक पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष निवडायचा झाला तर किती प्रयत्न करावे लागतात आणि या देशात चक्क तीन राष्ट्राध्यक्ष निवडले जातात? असा प्रश्न जगातील कोणत्याही नागरिकाला पडू शकतो. पण युरोपमधल्या एका देशात तीन राष्ट्राध्यक्ष निवडले जातात. बोस्निया-हर्जेगोविना असं या देशाचं नाव आहे. युगोस्लावियाने दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात जास्त भौगोलिक, वांशिक, धार्मिक, भाषिक अस्थिरता अनुभवली.

 बाल्कन प्रदेशातील देशांमध्ये इतके नवे देश निर्माण झाले कोणत्याही भौगोलिक प्रदेशाचे तुकडे पडण्याला बाल्कनायजेशन अशा संज्ञेने ओळखलं जाऊ लागलं. आज हे देश युद्ध, दंगली, स्थलांतरितांचे लोंढे अशा तणावातून थोडे स्थिर झाले असले तरी बोस्निया हर्जेगोविनामधील राजकीय स्थिती कमालीची गुंतागुंतीची आहे.भारताच्यादृष्टीने चिमुकल्या म्हणाव्या अशा या देशातसुद्धा फेडरेशन आॅफ बोस्निया अँड हर्जेगोविना (सोयीसाठी याला फेडरेशन असं संबोधलं जातं) आणि रिपब्लिका स्राप्स्का असे दोन भाग आहेत. त्यातल्या पहिल्या भागात बहुसंख्येने बोस्निआक (मुस्लीम) आणि क्रोट्स (कॅथलिक) तर दुसऱ्या भागामध्ये मुख्यत: सर्ब (आॅर्थोडॉक्स) लोक राहातात. यांच्याबरोबर रोमा (जिप्सी) आणि ज्यू हे अल्पसंख्येने आढळतात. या देशातले नागरिक तीन राष्ट्राध्यक्ष निवडतात. त्यातले एक बोस्निआक, एक क्रोट आणि तिसरे सर्ब वंशाचे असतात. त्यातील बोस्निआक आणि क्रोट वंशाचे फेडरेशनमधून तर सर्ब राष्ट्राध्यक्ष रिपब्लिका स्राप्स्कामधूनच निवडून आले पाहिजेत असा नियम आहे. जर फेडरेशनमध्ये राहाणाऱ्या सर्ब व्यक्तीला आपल्या वंशाच्या म्हणजे सर्ब व्यक्तीला मतदान करायचे असेल तर ते शक्य नाही तसेच स्राप्स्कामध्ये राहाणाऱ्या बोस्निआक आणि क्रोट लोकांना आपल्या वंशाच्या लोकांना मतदान करायचे असेल तर ते शक्य नाही कारण तेथून फक्त सर्ब व्यक्तीच निवडली जाऊ शकते. दर चार वर्षांनी येथे हे तीन राष्ट्राध्यक्ष, संसदेतील प्रतिनिधी आणि फेडरेशन व स्राप्स्काची विधिमंडळांतील प्रतिनिधी निवडले जातात.तिन्ही राष्ट्राध्यक्षांपैकी प्रत्येकाकडे दर आठ महिन्यांनंतर प्रत्यक्ष अध्यक्षपदाचा ताबा असतो. त्यामुळे या देशातल्या लोकांना सध्या आपल्या देशाचे नक्की राष्ट्राध्यक्ष कोण आहेत हे फारसे माहितीच नसते. इतका राजकीय गोंधळ असणाऱ्या देशाची लोकसंख्या केवळ ३५ लाख इतकीच आहे. त्यातील ३३ लाख लोकांना मतदानाचा अधिकार आहे. या गुंतागुतीच्या रचनेमुळे प्रत्येकाची परवानगी मिळवता मिळवता एखादा निर्णय घेण्यास भरपूर वेळ जातो. त्यामुळे येथे उद्योग, व्यापार मंदावला असून बेकारीही प्रचंड आहे. १९७० च्या दशकामध्ये या देशात समाजवादी रचना होती. तेव्हा प्र

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षInternationalआंतरराष्ट्रीय