शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर उभारली जाणार भिंत; पँटॉगॉनकडून एक अब्ज डॉलर मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 11:43 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वपूर्ण घोषणेसाठी निधी मंजूर 

वॉशिंग्टन: अमेरिकेचं संरक्षण कार्यालय असलेल्या पँटॉगॉननं मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी एक अब्ज डॉलर मंजूर केले आहेत. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधणं ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी याबद्दलचं आश्वासन दिलं होतं. संसदेनं भिंत उभारणीसाठी निधी मंजूर न केल्यानं काही दिवसांपूर्वी अमेरिकेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. विरोधकांनी यावरुन ट्रम्प सरकारला कोंडी पकडल्यानं सर्वच खर्चांना मिळणारी मंजुरी रखडली होती. त्यामुळे देशभरातील कर्मचाऱ्यांचं वेतन थकलं होतं.अमेरिकेच्या संरक्षण कार्यालयाचे प्रमुख असलेल्या पॅट्रिक शानाहान यांनी मेक्सिकोच्या सीमेवरील भिंतासाठी एक अब्ज डॉलर देण्यास मंजुरी दिली. अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर 92 किलोमीटरची भिंत उभारली जाणार आहे. ही भिंत 5.5 मीटर उंच असेल. सीमेवर भिंत उभारली जात असताना या भागातील रस्ते सुधारले जातील. याशिवाय पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात येईल. 'आर्मी कोअर ऑफ इंजिनियर्सच्या कमांडरना सुरक्षा, सीमाशुल्क विभागाच्या मदतीसाठी एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर करण्यात आला आहे,' अशी माहिती पँटॉगॉननं प्रसिद्धीपत्रातून देण्यात आली आहे. 'संघराज्य कायद्यानुसार सीमेवर भिंत उभारली जाऊ शकते. संरक्षण मंत्रालयाला तसा अधिकार आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरील अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे,' असं पॅट्रिक शानाहान यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :United StatesअमेरिकाUSअमेरिकाAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पMexicoमेक्सिको