शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या विमानाचा दरवाजा उघडून अचानक उतरले दोन प्रवासी; अन्....

By कुणाल गवाणकर | Updated: December 23, 2020 13:28 IST

विमान उड्डाण करण्यासाठी रनवेच्या दिशेनं जात असताना अचानक दोन प्रवाशांनी दरवाजा उघडला

न्यूयॉर्क: विमान उड्डाण करण्यासाठी रनवेच्या दिशेनं जात असताना अचानक दोन प्रवाशांनी दरवाजा उघडल्याची घटना घडली आहे. विमान रनवेकडे जात असताना दोघे एमर्जन्सी दरवाजा उघडून स्लायडर ऍक्टिवेट करून बाहेर पडल्याची माहिती डेल्टा एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी दिली.डेल्टा एअरलाईन्सचं विमान न्यूयॉर्कहून अटलांटाकडे निघालं असताना दोन प्रवासी एमर्जन्सी दरवाजा उघडून अचानक बाहेर पडले. ३१ वर्षीय एन्टोनियो मर्डॉक आणि २३ वर्षीय ब्रिअना ग्रेसो यांच्यासोबत त्यांचा कुत्रादेखील विमानाबाहेर आला. पोलिसांनी दोन्ही प्रवाशांना ताब्यात घेतलं. दोघेही फ्लोरिडाचे रहिवासी आहेत. एमर्जन्सी दरवाजातून बाहेर पडण्यापूर्वी दोन्ही प्रवाशांनी अनेकदा विमानात त्यांचं आसान बदललं होतं. आपण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरचा सामना करत असल्याचा दावा एन्टोनियोनं केला.घटनेनंतर सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं आणि त्यांना दुसऱ्या विमानातून अटलांटाला पाठवलं गेलं. जॉन्सन नावाच्या एका प्रवाशानं एन्टोनियो आणि ब्रिअनासोबत विमानात आसनांची अदलाबदल केली होती. त्यावेळी एन्टोनियो आपल्याशी व्यवस्थित बोलत होता. त्याच्या वागण्या-बोलण्यातून मला कोणत्याही प्रकारचा संशय आला नाही, असं जॉन्सन यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एन्टोनियो आणि ब्रिअना यांच्याविरोधात खटला चालणार आहे.