शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

परवेझ मुशर्रफ यांची २३ पक्षांची महाआघाडी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:19 IST

           पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी २३ राजकीय पक्षांची महाआघाडी स्थापन केली आहे. या महाआघाडीचे नाव ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’(पीएआय) असे असणार आहे. याच्या अध्यक्षपदी मुशर्रफ (७४) असतील, तर इकबाल डार यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.    

ठळक मुद्दे ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’च्या स्थापनेने नवी समीकरणे    

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी २३ राजकीय पक्षांची महाआघाडी स्थापन केली आहे. या महाआघाडीचे नाव ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’(पीएआय) असे असणार आहे. याच्या अध्यक्षपदी मुशर्रफ (७४) असतील, तर इकबाल डार यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

            स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, मुशर्रफ यांनी दुबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मीडियाला संबोधित करताना म्हटले की, मुहाजिर समुदायाचे प्रतिनिधित्व करणाºया सर्व पक्षांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे. त्यांनी मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) आणि पाक सरजमी पार्टी (पीएसपी) यांना या नव्या राजकीय आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या आघाडीच्या स्वरूपाबाबत त्यांनी सांगितले की, सर्व सदस्य पक्ष एकाच नावाने सोबत निवडणुका लढतील.    

मुशर्रफ हे एमक्यूएमचे नेतृत्व करीत असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले. एखाद्या अल्पसंख्यांक पक्षाचे नेतृत्व मी करणे हे हास्यास्पद असल्याचे सांगून ते म्हणाले की, एमक्यूएम-पाकिस्तानचे जे अस्तित्व मूळ स्वरूपात होते ते आता फक्त अर्ध्यावर आले आहे. पक्षाच्या अंतर्गत समस्येबाबत मी चिंतित आहे. जर हा पक्ष एकजूट राहत असेल तर, फारुक सत्तार अथवा मुस्तफा कमाल यांना बदलण्यात मला काही स्वारस्य नाही. एमक्यूएमवर टीका करताना ते म्हणाले की, पक्ष आणि मुहाजिर समुदाय आदर हरवून बसले आहेत.              पाकिस्तान मुस्लिम लीग-कायदचे नेते चौधरी शुजात आणि चौधरी परवेज इलाही हेही त्यांच्या महाआघाडीत सहभागी होतील, असा विश्वास मुशर्रफ यांनी व्यक्त केला, तर पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनीही या आघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहन मुशर्रफ यांनी केले. 

मुशर्रफ यांच्यावर गतवर्षी विशेष न्यायालयाने देशद्रोहाचा आरोप लावला होता. यावर्षी आॅगस्टमध्ये बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणात त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. त्यांनी असा दावा केला की, सर्व आरोपांचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत. कारण, न्यायालये नवाज शरीफ यांच्या नियंत्रणात नाहीत.