शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सिनिअर जॉर्ज बुश यांची वाढदिवशी पॅराशूट उडी

By admin | Updated: June 14, 2014 03:56 IST

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांनी गुरुवारी सहाय्यकाच्या मदतीने हेलिकॉप्टरमधून पॅराशूटद्वारे उडी मारून आपला ९० वा वाढदिवस साजरा केला. त्यांची ही आठवी पॅराशूट उडी होती.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांनी गुरुवारी सहाय्यकाच्या मदतीने हेलिकॉप्टरमधून पॅराशूटद्वारे उडी मारून आपला ९० वा वाढदिवस साजरा केला. त्यांची ही आठवी पॅराशूट उडी होती. माईनेतील हा एक अत्यंत आल्हाददायक दिवस आहे. पॅराशूट उडीसाठी पुरेसा पूरक असा, असे टष्ट्वीट सीनिअर बुश यांनी केले आहे. अलीकडील काही समारंभामध्ये बुश हे अशक्त वाटले होते. त्यांनी मायनेच्या केन्नेबंकपोर्टजवळील आपल्या घराजवळ हेलिकॉप्टरमधून पॅराशूटद्वारे उडी घेतली. त्याचे चित्रीकरण टीव्हीवर दाखविण्यात आले. यात हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालताना दिसते. त्यानंतर त्यातून बुश उडी घेताना आणि काही क्षणांनी ते जमिनीवर उतरल्याचे दिसून येते. उपस्थितांनी त्यांच्या नव्वदीतील या साहसाचे कौतुक केले. पहिली पॅराशूट उडी दुसऱ्या महायुद्धात सिनिअर बुश यांनी पहिली पॅराशूट उडी दुसऱ्या महायुद्धादरम्यान घेतली होती. तो दिवस होता दोन सप्टेंबर १९४४. प्रशांत महासागरातील ची ची जिमा बेटावर त्यांच्या विमानावर हल्ला करण्यात आला असताना त्यांनी पॅराशूटद्वारे उडी घेतली होती. त्यांनी हा अनुभव एनबीसी वाहिनीवर कथन केला. याच घटनेच्या स्मृतीने आपणास पुन्हा उडी मारण्यास प्रवृत्त केल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या उडीदरम्यान मी पॅराशूटची रिप कॉर्ड खूपच आधी ओढल्याने विमानाचे शेपूट डोक्यावर आदळले होते. त्यामुळे मी पॅराशूट उडीदरम्यानची ही चूक पुढे दुरुस्त करण्याचे ठरवले होते. (वृत्तसंस्था)