शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंगापूरमध्ये कोरोनाकाळात मूल जन्माला आलं, तर पालकांना मिळणार ढासू 'बेबी बोनस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 21:42 IST

मात्र, अद्याप देण्यात येणाऱ्या रकमेचा तपशील सरकारने जारी केलेला नाही. प्रोत्साहनपर दिली जाणारी ही रक्कम सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक छोट्या बेबी बोनसच्या व्यतिरिक्त आहे. (singapore)

सिंगापूर - येथे कोरोना महामारीच्या काळात मुलं जन्माला घालण्यासाठी लोकांना पैसे दिले जात आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या नोकऱ्यांवर गदा आल्याने ते आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. एवढेच नाही, तर आपले कुटुंब वाढविण्याचीही त्यांची इच्छा नाही. त्यांची ही चिंता आणि ताण तणाव दूर करण्यासाठी सिंगापूरसरकारने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप देण्यात येणाऱ्या रकमेचा तपशील सरकारने जारी केलेला नाही. प्रोत्साहनपर दिली जाणारी ही रक्कम सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक छोट्या बेबी बोनसच्या व्यतिरिक्त आहे.

सिंगापूर, जगातील सर्वात कमी जन्मदर असलेला देश - जगातील सर्वात कमी जन्मदर सिंगापूरमध्ये आहे. तो वाढावा यासाठी अनेक वर्षांपासून लोकांना प्रोत्साहन दिले जात आहे. सिंगापूर हा देश आपले शेजारी असलेल्या इंडोनेशिया आणि फिलिपीन्सच्या तुलनेत अत्यंत वेगळा आहे. खरे तर या देशात, कोरोना व्हायरस लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्भधारणा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. सिंगापूरच्या उप पंतप्रधान हेंग स्वी कीट सोमवारी म्हणाल्या, आमच्या काणावर आले आहे, की करोना व्हायरसमुळे मुलं जन्माला घालण्याचा विचार करत असलेल्या लोकांनी आपला विचार स्थगित केला आहे. उप पंतप्रधानांनी यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेसंदर्भात आणि ती दिलीजाण्यासंदर्भात, नंतर घोषणा केली जाईल, असे म्हटले आहे.

सिंगापूरमधील सध्याची बेबी बोनस प्रणाली -सिंगापूरमध्ये सध्या सुरू असलेल्या बेबी बोनसच्या नियमानुसार, संबंधित अपत्याच्या आई-वडिलांना 10,000 सिंगापूर चलनापर्यंत (जवळपास 5.50 लाख रुपये) दिले जातात. सरकारी आंकडेवारीनुसार, 2018मध्ये सिंगापूरमधील प्रजनन दर मागील आठ वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी नोंदवला गेला. जो प्रति महिला 1.14 एवढा आहे. ढासळणारा प्रजनन दर हा आशियातील अनेक देशांत चिंतेचा विषय आहे.

चीनमध्ये या वर्षाच्या सुरुवातील 70 वर्षांतील सर्वात कमी प्रजनन दर नोंदवला गेला. मुलांशी संबंधित या योजनेवर टीकाही करण्यात आली आहे.

टॅग्स :singaporeसिंगापूरGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या