शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरी, भेळ आणि 'चायपानी'!; स्वस्त आणि मस्त भारतीय मेन्यू देणाऱ्या 'चायपानी'ला अमेरिकेत पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 08:49 IST

स्वस्त आणि मस्त भारतीय मेन्यू बनवणाऱ्या ‘चायपानी’ या अमेरिकेतल्या एका उपाहारगृहाला शिकागो इथे झालेल्या जेम्स बियर्ड पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम उपाहारगृहाचा पुरस्कार मिळाला.

पाणीपुरी असो की पावभाजी, वडापाव असो की भेळ, खाऊगल्लीत आणि रस्त्यावर मांडलेल्या स्टॉल्समध्ये मिळणारे चाट आयटम चटपटीत तर असतातच, पण त्याचबरोबर खिशालाही परवडणारे असतात. भारतीय स्ट्रीट फूडच्या या वैशिष्ट्यांमुळे आता भारताबाहेरही हे लोण पसरले आहे. स्वस्त आणि मस्त भारतीय मेन्यू बनवणाऱ्या ‘चायपानी’ या अमेरिकेतल्या एका उपाहारगृहाला शिकागो इथे झालेल्या जेम्स बियर्ड पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम उपाहारगृहाचा पुरस्कार मिळाला. मुख्य म्हणजे या स्पर्धेत अमेरिकेतल्या अनेक नामी उपाहारगृहांनी भाग घेतला होता. आता तुम्ही विचाराल, चायपानी रेस्टॉरंटमध्ये असं काय आहे जे अमेरिकेतल्या भल्या भल्या रेस्टॉरंटमध्ये नाही? खरंतर अमेरिकेत जागोजागी स्ट्रीट फूड मिळतं. बहुतेक ठिकाणच्या फास्टफूड रेस्टॉरंटमध्ये ड्राईव्ह थ्रूची सोय असते. ऑर्डर द्या, पैसे भरा आणि हातात स्नॅक घेऊन पुढे निघा. पण ‘चायपानी’ने चाट आयटम्सची सवय अमेरिकनांना लावली. पिझ्झा, बर्गर खाणारे अमेरिकन्स पाणीपुरी, भेळपुरी खाऊ लागले आहेत. त्यात सध्या शाकाहार आणि त्यातही वेगाने खाणं पसंत करणारे लोक वाढत आहेत. चाट आयटम म्हणजे शाकाहार म्हटल्यावर अनेकांनी या पदार्थांकडे लक्ष वळवलं.  भारतात लोकप्रिय असलेली थाळीही इथल्या मेन्यूवर आहे. भारतीय चाट कुरकुरीत, मसालेदार, आंबट गोड, चविष्ट असते. पण जशी चाट खाऊन तोंडाला चव येते, तसंच घरचं जेवण जेवलं की मन तृप्त होतं, म्हणूनच थाळी पण तेवढीच महत्त्वाची. 

याच पुरस्कार सोहळ्यात अजून एक अतिशय प्रतिष्ठेचा, बेस्ट शेफ हा पुरस्कार चिंतन पांड्या या भारतीय शेफला मिळाला. चिंतन जिथे काम करतो, त्या धमाका नावाच्या उपाहारगृहात चाट आयटमच मिळतात हे अजून महत्त्वाचं ! रोनी मुजुमदार आणि चिंतन पांड्या यांनी ऐन कोविड साथीत धमाका सुरू केले. होम डिलिव्हरीजवर भर दिला आणि थोड्याच काळात धमाकाचा समावेश न्यूयॉर्क टाईम्सने घोषित केलेल्या न्यूयॉर्कच्या दहा सर्वोत्कृष्ट उपाहारगृहांत झाला. एकूण चाट पदार्थ आणि त्यातील नावीन्य हे आगामी काळात अमेरिकनांना वेड लावणार हे नक्की.

- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकारbhalwankarb@gmail.com

टॅग्स :foodअन्नUSअमेरिका