शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा”; मनसेचा बच्चू कडूंना पाठिंबा
3
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...
5
Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद
6
रुग्णालयात सुरू होती शस्त्रक्रिया तेवढ्यात फॉल्स सिलिंग तुटून ऑपरेशन थिएटरमध्ये पडला कुत्रा, त्यानंतर...  
7
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापती म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसताय?'
8
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
9
महाकाय किंग कोब्रा सापाची महिला वन अधिकाऱ्याने केली सुटका, सचिन तेंडुलकरने केलं कौतुक
10
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
11
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
12
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
13
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
14
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
15
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
16
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
17
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
18
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
19
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
20
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण

संयुक्त राष्ट्रात फडकणार आता पॅलेस्टाईनचा झेंडा

By admin | Updated: October 1, 2015 00:06 IST

पॅलेस्टाईनची गेली अनेक वर्षे रखडलेली मागणी आता मान्य झाली असून संयुक्त राष्ट्राच्या आवारात इतर ध्वजांसह पॅलेस्टाईनचाही झेंडा फडकणार आहे

न्यूयॉर्क : पॅलेस्टाईनची गेली अनेक वर्षे रखडलेली मागणी आता मान्य झाली असून संयुक्त राष्ट्राच्या आवारात इतर ध्वजांसह पॅलेस्टाईनचाही झेंडा फडकणार आहे. सप्टेंबर महिन्यातच पॅलेस्टाईन आणि व्हॅटिकनचा ध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला.पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय ११९ देशांनी बहुमताने पारित केला, तर ४५ सदस्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. इस्रायलने पॅलेस्टाईनचा ध्वज फडकविण्यास अर्थातच कडाडून विरोध केला होता. इस्रायल, अमेरिकेसह इतर सहा देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले होते. २०१२ साली पॅलेस्टाईनचा दर्जा वाढवून त्यास व्हॅटिकन सिटीप्रमाणे नॉन मेंबर आॅब्झर्व्हरचा दर्जा दिला होता. त्यानंतरही ध्वज फडकविण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. पॅलेस्टाईन अ‍ॅथॉरिटीचे अध्यक्ष मेहमूद अब्बास यांनी हा आमच्यासाठी अत्यंत भावनिक क्षण असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये मेहमूद अब्बास आणि नंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांची भाषणे होणार आहेत. (वृत्तसंस्था)गेले काही आठवडे इस्रायलची राजधानी जेरुसलेममधील पवित्र अल अक्सा मशिदीजवळ तणाव निर्माण करणाऱ्या घटनांमुळे आधीच दोन्ही गटांमधील वातावरण तापले आहे. कदाचित या पार्श्वभूमीमुळे अब्बास आणि नेतान्याहू दोघेही संयुक्त राष्ट्रात एकमेकावर आगपाखड करण्याची शक्यता आहे.(वृत्तसंस्था)