शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला साथ देणाऱ्या देशांवर मिसाईल टाकू; पाक मंत्र्याची दर्पोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 10:31 IST

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा विरोध प्रदर्शन अद्यापही सुरूच आहे. 

इस्लामाबादः जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा विरोध प्रदर्शन अद्यापही सुरूच आहे. या मुद्द्यावर पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रातही दाद मागितली. पण तिकडेही त्यांना अपयश आलं. तरीही पाकिस्तानकडून भारताविरोधात वादग्रस्त विधान करण्याचा सिलसिला कायम आहे. आता पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री असलेल्या अली अमीर गंदापूर यांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आम्ही मिसाईल टाकू, असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला आहे.जर काश्मीरच्या मुद्द्यावर भारताबरोबरचा तणाव वाढल्यास पाकिस्तान युद्धासाठीही तयार आहे. अशातच जे देश काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला समर्थन देत आहेत, ते आमचे शत्रू आहेत. आम्ही भारतबरोबरच त्या देशांवरही मिसाइल टाकू, असंही ते म्हणाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाच्या दौऱ्यावर आलेल्या अमेरिकी काँग्रेसच्या एका प्रतिनिधीमंडळाला सांगितलं की, काश्मीरमधली परिस्थिती पाहता भारताबरोबर वार्तालाप करण्यात कोणताही फायदा नाही.अमेरिकी सिनेटर क्रिस वान होलेन आणि मॅगी हसन यांना इम्रान खान यांनी सांगितलं की, भारताबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केल्यानंतर दोन्ही सिनेटरनं आपला अनुभवही पंतप्रधानांकडे कथन केला आहे. मी भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा व्हावी, यासाठी प्रयत्न केले होते, परंतु आता ते शक्य नाही, असं इम्रान खान म्हणाले होते, तर दुसरीकडे भारतानंही पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला पोसणं थांबवत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याची भूमिका घेतली आहे. काश्मीरमध्ये मानवाधिकारांच्या होत असलेल्या उल्लंघनासंबंधी अमेरिकी सिनेटर होलेन यांनीही चिंता व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान