शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेमुळे पाकिस्तानची चीन, रशियाशी जवळीक? ट्रम्प यांचे नवे धोरण होणार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 01:25 IST

इस्लामाबाद : अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाची नवी अफगाण रणनीती पाकिस्तानला चीन व रशियाच्या अधिक निकट नेऊ शकते. मीडियातील अहवालात हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोमवारी रात्री (भारतात मंगळवारी सकाळी) युद्धप्रभावित अफगाणिस्तानसाठी बहुप्रतीक्षित नवी रणनीती जाहीर होणार आहे. पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेण्यासाठी अमेरिकेत सर्वसहमती झाल्याचे ट्रम्प प्रशासनाने संकेत दिले आहेत.रणनीतीच्या समीक्षेत दरम्यान ...

इस्लामाबाद : अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाची नवी अफगाण रणनीती पाकिस्तानला चीन व रशियाच्या अधिक निकट नेऊ शकते. मीडियातील अहवालात हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सोमवारी रात्री (भारतात मंगळवारी सकाळी) युद्धप्रभावित अफगाणिस्तानसाठी बहुप्रतीक्षित नवी रणनीती जाहीर होणार आहे. पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेण्यासाठी अमेरिकेत सर्वसहमती झाल्याचे ट्रम्प प्रशासनाने संकेत दिले आहेत.रणनीतीच्या समीक्षेत दरम्यान ट्रम्प प्रशासनाने भारताच्या भूमिकेच्या शक्यतेवरही विचार केला आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी स्पष्ट केले आहे की, हे धोरण पूर्ण दक्षिण आशियासाठी आहे. द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने म्हटले आहे की, या धोरणाच्या परिणामांचे संतुलन राखण्यासाठी पाकिस्तान विविध पर्यायांवर विचार करीत आहे. हे धोरण म्हणजे आगामी काळात पाकिस्तानची परीक्षा असेल. अमेरिकेकडून कठोर पावले उचलली जाण्याच्या शक्यतेमुळे चीन आणि रशियासोबत सहकार्य वाढविण्याशिवाय पाकिस्तानकडे अन्य पर्याय राहत नाही, असे सांगण्यात येते. पाक आणि चीन यांच्यातील संबंध ‘वन बेल्ट वन रोड’या योजनेमुळे अधिक दृृढ होत आहेत. (वृत्तसंस्था)मदत होणार बंद?‘फॉरेन पॉलिसी’या मासिकाने म्हटले आहे की, पाकिस्तानला दिली जाणारी सर्व लष्करी मदत संपविण्याचा विचार ट्रम्प प्रशासन करत आहे. पाकिस्तान अमेरिकेला धोका देत आहे, असे अमेरिकेला वाटत आहे. याउलट आम्हाला दबावात ठेवण्याची अमेरिकेची भूमिका आहे, असे पाकिस्तानी अधिकाºयांचे म्हणणे आहे.