शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

पाकमध्ये ३९ दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Updated: February 18, 2017 01:38 IST

इस्लामिक स्टेटने सिंध प्रांतातील सूफी दर्ग्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी शुक्रवारी दहशतवाद्यांविरुद्ध

इस्लामाबाद : इस्लामिक स्टेटने सिंध प्रांतातील सूफी दर्ग्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी शुक्रवारी दहशतवाद्यांविरुद्ध देशव्यापी धडक कारवाई सुरू केली असून, त्यात ३९ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. लाल शाहबाज कलंदर येथे गुरुवारी आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात १00 भाविक ठार, तर २५० हून अधिक जखमी झाले होते. लष्कर दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करीत असतानाही या आठवड्यात देशात अनेक हल्ले झाले. सुफी दर्ग्यावरील हल्ला सर्वात घातक होता.पाकचे निमलष्करी दल असलेल्या सिंध रेंजर्सने सिंध प्रांतात रकेलेल्या कारवाईत १८ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. निमलष्करी जवान सेहवान (सूफी दर्गा जेथे आहे ते ठिकाण) येथून परतत असताना काथोरजवळ रस्त्यावर त्यांना दहशतवादी आढळून आले. जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात सात जण मारले गेले. उर्वरित ११ दहशतवाद्यांचा कराचीत खात्मा करण्यात आला. वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात १२ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. पेशावरमध्ये तीन, ओरकझाई आदिवासी भागात ४, तर बान्नू येथे ४ जणांना मारण्यात आले. या दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि हातबॉम्ब जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. खुर्रम आणि मोहंमद भागातील स्वतंत्र घटनांत तीन दहशतवादी मारले गेले. यावेळच्या चकमकीत एक जवानही मृत्युमुखी पडला. बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. पंजाब प्रांतातील सरगोधा येथे दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सरकारने दहशतवादाचा नायनाट करण्याचा संकल्प केला असल्यामुळे ही कारवाई येत्या काही दिवसांत आणखी तीव्र होईल. गेल्या आठवड्यात देशात एकापाठोपाठ हल्ले झाल्यानंतर सरकार आणि लष्कर कारवाई आवश्यक असल्याचे निष्कर्षाप्रत आले आणि कारवाई सुरू झाली. पाकिस्तान लष्कराने पाक-अफगाण सीमेजवळील शालमान भागात मोहीम सुरू केली असून, यात तोफांचाही वापर करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना पळून जाता येऊ नये म्हणून पाक-अफगाण सीमा तोखराम येथे बंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पाकमध्ये एकापाठोपाठ आठ दहशतवादी हल्ले झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी एकापाठोपाठ कारवाई सुरू केली. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी घेतलेल्या बैठकीत सहभागी उच्चपदस्थांनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सहमती दर्शविली होती. सुफी दर्ग्यावरील हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने आपल्या आमाक या वृत्तसंस्थेद्वारे स्वीकारली होती. (वृत्तसंस्था) दहशतवादी आमच्याकडे सोपवापाकिस्तानी लष्कराने ७६ वॉन्टेड (हवे असलेले) दहशतवाद्यांची यादी अफगाणिस्तानला दिली आहे. हे दहशतवादी अफगाण भागात दडून बसलेले आहेत.अफगाणिस्तानने या दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी पाकने केली आहे. अफगाण दूतावासाच्या एका अधिकाऱ्याला रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात पाचारण करण्यात आले होते, असे लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसीफ गफूर यांनी सांगितले. या दहशतवाद्यांवर कारवाई करावी वा त्यांना पाकच्या स्वाधीन करावे, असे त्यांना सांगण्यात आले. तथापि, लष्कराने अफगाणिस्तानला दिलेल्या यादीतील दहशतवाद्यांची नावे उघड केली नाहीत.