शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'काश्मीर सोडा, अफगाणिस्तानवर बोला'; जपानसमोर पाकिस्तान तोंडघशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 15:02 IST

जपानच्या राजदूतांसमोर पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तोंडावर पडले

इस्लामाबाद: आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काश्मीर राग आळवणारा पाकिस्तान तोंडावर पडला आहे. जपानकडे काश्मीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला मोठी नामुष्की सहन करावी लागली आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर खान जंजुआ यांनी जपानचे राजदूत तकाशी कुराई यांच्याकडे एका बैठकीदरम्यान काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. मात्र जपानी राजदूतांनी काश्मीरचा विषय टाळून अफगाणिस्तानच्या विषयाला हात घातला. त्यामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची पंचाईत झाली. 'काश्मीरमधील स्थितीवरुन जगाचं लक्ष विचलित करण्यासाठी भारतीय लष्कराकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार केला जातो,' असे नासिर खान जंजुआ यांनी तकाशी कुराई यांनी सांगितलं. मात्र कुराई यांनी उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील ताणलेल्या संबंधांवर चर्चा सुरू केली. यानंतर त्यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीकडे जंजुआ यांचं लक्ष वेधलं. त्यामुळे काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला. जपानी राजदूतांनी अचानक अफगाणिस्तानचा मुद्दा उपस्थित केल्यानं पाकिस्तानला धक्का बसला. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती जंजुआ यांनी कुराई यांना दिली. 'पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांनी नुकताच अफगाणिस्तानाचा दौरा केला. त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अफगाणिस्तान घेत असलेल्या प्रयत्नांचं कौतुकदेखील केलं,' असं जंजुआ यांनी कुराई यांना सांगितलं.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तान