आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची प्रतिमा मलीन करण्याचा पाकिस्तानचा आणखी एक प्रयत्न सपशेल फसला आहे. 'फ्रान्स-२४' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारतावर गंभीर आरोप करणाऱ्या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची एका फ्रेंच पत्रकाराने चांगलीच नाचक्की केली. "भारतावर आरोप करण्यापूर्वी ठोस पुरावे द्या, उगीच काल्पनिक गोष्टी सांगू नका," अशा शब्दांत वरिष्ठ पत्रकार मार्क पेरेलमॅन यांनी सुनावताच आसिफ यांना उत्तर सुचेनासे झाले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकं काय घडलं मुलाखतीत?
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे फ्रान्समधील प्रसिद्ध पत्रकार मार्क पेरेलमॅन यांना मुलाखत देत होते. यावेळी बोलताना आसिफ यांनी जुनाच राग आळवत म्हटले की, "भारत अफगाणिस्तानच्या मदतीने पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणत आहे. तालिबान आणि भारताने आता हातमिळवणी केली आहे." हा गंभीर आरोप ऐकताच पेरेलमॅन यांनी त्यांना मध्येच रोखले आणि थेट विचारले, "हा खूप मोठा आरोप आहे, तुमच्याकडे याचा काही ठोस पुरावा आहे का? पुराव्याशिवाय असे आरोप केले जात नाहीत."
पुराव्याऐवजी सांगितली 'क्रोनोलॉजी'
पत्रकाराने पुराव्याची मागणी करताच ख्वाजा आसिफ गोंधळले. त्यांच्याकडे कोणताही थेट पुरावा नव्हता. त्यावर सारवासारव करत ते म्हणाले, "आम्ही फक्त क्रोनोलॉजी जोडत आहोत. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानात हल्ले करते आणि त्यांचे तळ अफगाणिस्तानमध्ये आहेत. भारत आणि तालिबानची मैत्री वाढली आहे, हे तुम्हाला दिसत नाही का?" मात्र, पत्रकाराने त्यांचे हे लॉजिक फेटाळून लावत त्यांना आरसा दाखवला.
तालिबानमुळे पाकिस्तानची झोप उडाली
मुलाखतीदरम्यान आसिफ यांनी कबूल केले की, एकेकाळी तालिबानसोबत असलेले पाकिस्तानचे संबंध आता कमालीचे बिघडले आहेत. "तालिबानने आमच्याविरुद्ध छुपं युद्ध पुकारलं आहे. जर काबुलकडून आम्हाला शांततेची हमी मिळाली नाही, तर आम्ही अफगाणिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो," अशी उघड धमकीही त्यांनी दिली. या संकटातून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तान आता तुर्की, कतार आणि सौदी अरेबियाची मदत घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गाझाबाबत मोठी घोषणा, पण घरूनच विरोध
याच मुलाखतीत आसिफ यांनी गाझाबाबत एक महत्त्वाची घोषणा केली. परिस्थिती सुधारल्यास पाकिस्तान गाझामध्ये शांतता सेना पाठवू शकतो आणि ५ अब्ज डॉलर्सची मदतही देऊ शकतो, असे त्यांनी म्हटले. मात्र, अमेरिकेच्या सांगण्यावरून पाकिस्तान 'गाझा पीस बोर्ड'मध्ये सामील झाल्यामुळे मायदेशात त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे, कारण या बोर्डचा मुख्य उद्देश हमासला संपवणे हा आहे.
Web Summary : Pakistan's attempt to malign India failed. Khawaja Asif's accusations of Indian involvement in terrorism were challenged by a French journalist who demanded concrete evidence, leaving Asif speechless. Pakistan's relations with the Taliban have deteriorated, and they are seeking aid from Turkey, Qatar, and Saudi Arabia.
Web Summary : भारत को बदनाम करने का पाकिस्तान का प्रयास विफल रहा। ख्वाजा आसिफ के भारत पर आतंकवाद में शामिल होने के आरोपों को एक फ्रांसीसी पत्रकार ने चुनौती दी, जिसने ठोस सबूतों की मांग की, जिससे आसिफ चुप हो गए। तालिबान के साथ पाकिस्तान के संबंध खराब हो गए हैं, और वे तुर्की, कतर और सऊदी अरब से सहायता मांग रहे हैं।