शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी पत्रकारांनी शाहबाज सरकारला दाखवली जागा, भर पत्रकार परिषदेत केला अर्थमंत्र्यांचा अपमान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:39 IST

पाकिस्तानने आयएमएफकडून कर्ज घेतल्यानंतर आता २०२५चं बजेट जाहीर केलं आहे. मात्र, यानंतर पाकिस्तानात चांगलाच गदारोळ माजला आहे.

पाकिस्तानने आयएमएफकडून कर्ज घेतल्यानंतर आता २०२५चं बजेट जाहीर केलं आहे. मात्र, यानंतर पाकिस्तानात चांगलाच गदारोळ माजला आहे. एकीकडे नागरिकांमध्ये रोष असतानाच,  पाकिस्तानमधील पत्रकारांनी अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांचा सार्वजनिकरित्या निषेध करत मोठं पाऊल उचलले आहे. २०२५चा अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतर, औरंगजेब पत्रकार परिषद घेण्यासाठी आले होते. मात्र, तिथेच त्यांना विरोधाचा सामना करावा लागला.

पत्रकारांनी त्यांना व्यासपीठावर बसू दिले आणि नंतर पत्रकार परिषद बहिष्कृत केली.शाहबाज शरीफ यांच्या सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याविरुद्ध पत्रकारांनी असा उघड निषेध करण्याची अशी ही पहिलीच वेळ आहे.

काय घडलं पत्रकार परिषदेत?दुनिया न्यूजच्या रिपोर्टनुसार, औरंगजेब मंचावर येताच पत्रकारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांनी अर्थमंत्र्यांचे बोलणे ऐकण्यास सरळ नकार दिला. औरंगजेब यांनी पत्रकारांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणीही त्यांचे ऐकून घेतले नाही. शेवटी पत्रकारांनी आपापले माईक उचलले आणि परिषद सोडून सरळ बाहेर निघून गेले.

पत्रकार नाराज का झाले?

पत्रकारांचे म्हणणे आहे की, सरकारकडून करविषयक माहिती लोकांना चुकीच्या पद्धतीने दिली आहे. जनतेला कोणतीही सवलत न देता केवळ खोटं चित्र उभं केलं जात आहे. त्यांनी आणखी एक आरोप केला की, फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे अधिकारी पत्रकारांना बजेट कव्हरेज दरम्यान त्रास देत आहेत.

हा निषेध का महत्त्वाचा आहे?इम्रान खान यांचे सरकार २०२२मध्ये कोसळल्यावर शाहबाज शरीफ सत्तेवर आले. त्यानंतर देशात अनेक पत्रकारांवर दबाव आणला गेला. काहींना कायदेशीर त्रास झाला, तर काहींना देश सोडावा लागला. त्यामुळे पत्रकारांचा हा निषेध पाकिस्तानातील माध्यम स्वातंत्र्यावर मोठं भाष्य करणारा ठरला आहे.

अर्थसंकल्पावरून राजकीय वाद सुरूया वर्षीच्या अर्थसंकल्पावरून पाकिस्तानमध्ये मोठा वाद पेटला आहे. संसदेत बजेट सादर करताना इम्रान खान यांच्या पक्षाचे खासदारही निषेध करत होते. इम्रान खान यांनी तुरुंगातूनच एक निवेदन जारी करून या अर्थसंकल्पावर टीका केली. त्यांनी याला "IMF बजेट" म्हटले. इतकंच नाही तर, यात सामान्य माणूस, नोकरदार वर्ग आणि शेतकरी यांच्यावर भार टाकण्यात आला आहे, असे त्यांनी म्हटले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBudgetअर्थसंकल्प 2024