शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"मी बहादूर शाह जफरचा नातलग, ताजमहाल आणि अयोध्या माझे..."; कुणी केला दावा? पत्रकारानं धोधो धुतला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:15 IST

या व्यक्तीने २०१८ मध्ये, थेट ताजमहालवरच दावा ठोकला होता. तसेच ती मालमत्ता आपल्या पूर्वजांची असून भारत सरकारने ती आपल्याला सोपवावी. मात्र, त्याचा हा दावा कायदेशीरपणे स्वीकारला गेला नाही.

पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी या आपल्या बिनधास्त शैलीसाठी प्रसिद्द आहेत. त्या अनेकवेळा भारतीय माध्यमांतही आपली भूमिका मांडताना दिसतात. त्या स्वतःचे यूट्यूब चॅनेलही चालवतात. त्याच्या यूट्यूब चॅनलचे नाव आरजू काझमी असेच आहे. त्या त्यांच्या या यूट्यूब चॅनेलवर रोज भेजा फ्राय नावाचा एक शो होस्ट करत असतात. यावेळी त्यांनी त्यांच्या या शोमध्ये अथवा कार्यक्रमात एका व्यक्तीचा उल्लेख केला आहे. जी व्यक्ती मुघल शासक बहादूर शाह जफरचा नातलग असल्याचा दावा करते. एवढेच नाही तर, ताजमहाल आणि अयोध्या आपली आहे, असेही या व्यक्तीचे म्हनणे आहे. यावर आरजू काझमी यांनी आपल्या कार्यक्रमात अतिशय मजेशीरपणे भाष्य केले आहे. "प्रिन्स याकुब हबीबुद्दीन तुसी नावाच्या व्यक्तीने ज्या प्रकारचे दावे केले आहेत, ते खरोखरच गमतीशीर आहेत," असे आरजू यांनी म्हटले आहे.

आपल्या कार्यक्रमात बोलताना आरजू काझमी म्हणाल्या, त्या भारतीय व्यक्तीचे (प्रिन्स याकुब हबीबुद्दीन तुसी) म्हणणे आहे की, बहादूर शाह जफर आपला पूर्वज होता, यामुळे ताजमहाल आपल्याला देण्यात यावा.  शिवाय अयोध्येतही बरीच जमीन आहे, जीच्यावर त्यांनी क्लेम केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, तीही आपल्याला देण्या यावी. आरजू यांनी संबंधित व्यक्तीची खिल्ली उडवत म्हटले आहे की, त्यांना वाटते की, पीएम मोदी त्यांच्याकडे येतील आणि म्हणतील की, 'जहांपनाह' आपण सांगा आम्ही आपल्याला कोण कोणत्या इमारती द्याव्यात? कोण आहे प्रिंस याकूब हबीबुद्दीन तुसी -प्रिन्स याकुब हबीबुद्दीन तुसी यांचे नाव अनेक वेळा चर्चेत येत असते. ते स्वतःला मुघल सम्राट बहादूर शाह जफरच्या सहाव्या पिढीतील वंशज म्हणवतात. त्यांची वेशभूषा आणि बोलण्याची शैली देखील मुघल सल्तनत काळाप्रमाणे आहे. याकुब तुसी हे हैदराबादमध्ये असतात. त्यांनी २०१८ मध्ये, थेट ताजमहालवरच दावा ठोकला होता. तसेच ती मालमत्ता आपल्या पूर्वजांची असून भारत सरकारने ती आपल्याला सोपवावी. मात्र, त्याचा हा दावा कायदेशीरपणे स्वीकारला गेला नाही. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTaj MahalताजमहालAyodhyaअयोध्या