शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:16 IST

नॅशनल कमांड अथॉरिटीची अशी कोणतीही बैठक नियोजित नसल्याचे पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी म्हटले आहे.

भारताविरुद्धच्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानच्या सरकारने अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याच्या वृत्ताला पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांना नकार दिला आहे. नॅशनल कमांड अथॉरिटीची अशी कोणतीही बैठक नियोजित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आधी पाकिस्तानच्या लष्कर अधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी भेटण्यासाठी बोलवल्याचे म्हटले जात होते. मात्र, माहिती मंत्र्यांनी याला तत्काळ प्रतिसाद दिला नसल्याचा दावा केला जात आहे. 

या संदर्भात एआरवाय टीव्हीशी बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ म्हणाले की, "तुम्ही ज्या गोष्टीबद्दल बोलत आहात, ती अस्तित्वात आहे. पण त्याबद्दल आता काही बोलू नये. ही खूप दूरची शक्यता आहे, सध्या त्यावर काहीही चर्चा करू नये. आपण त्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वी परिस्थिती शांत होईल, असे मला वाटते. मात्र, सध्या नॅशनल कमांड अथॉरिटीची कोणतीही बैठक झालेली नाही आणि अशी कोणतीही बैठक नियोजित नाही."

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार यांनी स्थानिक टेलिव्हिजनशी बोलताना सांगितले की, "जर भारत येथे थांबला तर, आम्ही येथे थांबण्याचा विचार करू."

भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये शनिवारी चर्चा झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. पाकिस्तानच्या हल्ल्यांबद्दल भारतीय लष्कराने शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, "शत्रुत्वाच्या सर्व कारवायांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे आणि त्यांना योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे." 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दल