शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:42 IST

सामान्य जनतेसाठी फारसा दिलासा नसतानाही, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाच्या प्रचंड तरतुदींमुळे पाकिस्तानातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पाकिस्तानच्या २०२५च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सामान्य जनतेसाठी फारसा दिलासा नसतानाही, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाच्या प्रचंड तरतुदींमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः पंतप्रधानांच्या खानसाम्याच्या अर्थात शेफच्या पगाराने चर्चेला उधाण आले आहे.

शाहबाज यांच्या स्वयंपाकासाठी ११ कोटींची तरतूदजिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ यांच्या खानसाम्याच्या पगारासाठी अर्थसंकल्पात दरवर्षी ११ कोटी पाकिस्तानी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचा अर्थ या शेफला दरमहा सुमारे ९० लाख रुपये पगार म्हणून दिले जातील. विशेष म्हणजे, यापूर्वी याच पदासाठी दरवर्षी ३ कोटी रुपये राखीव होते, म्हणजेच नव्या बजेटमध्ये या खर्चात तिपटीने वाढ झाली आहे.

बागेच्या देखभालीसाठी ४.४८ कोटी रुपये!पंतप्रधान निवासातील बागेची देखभाल करण्यासाठी तब्बल ४ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये माळींचे वेतन, फुलझाडांची खरेदी यांचा समावेश आहे. हाच खर्च महिन्याच्या हिशोबाने पाहिला तर, ३५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

सुरक्षेसाठीही मोठी तरतूद

शाहबाज शरीफ यांच्या सुरक्षेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत १४ कोटींनी अधिक आहे. त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासाठीही ९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे नवीन गाड्यांची खरेदी होऊ शकते.

दवाखाना आणि पगारासाठी स्वतंत्र निधी

पंतप्रधान निवासातील प्राथमिक दवाखान्यासाठी १.५ कोटी रुपये, तर निवासस्थानी काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सामान्य नागरिकांसाठी काय?या साऱ्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर, इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (PTI) या पक्षाने अर्थसंकल्पाचा तीव्र निषेध करत देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. यंदाचा हा संपूर्ण अर्थसंकल्प आयएमएफच्या सूचनांनुसार तयार करण्यात आला असून, यात सामान्य शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गीयांसाठी कोणतीही ठोस मदत नाही, असे विरोधी पक्षाने म्हटले.

हा जनतेचा विश्वासघात आहे!इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफने म्हटले की, कर वाढवून सरकारने फक्त जनतेवर आर्थिक भार वाढवला असून, पंतप्रधानांसाठी होत असलेल्या खर्चामुळे हा अर्थसंकल्प जनतेचा विश्वासघात करणारा आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBudgetअर्थसंकल्प 2024