शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ज्या ठिकाणी झाली भारतीय पत्रकाराची हत्या, तिथे फडकत आहेत पाकिस्तान आणि तालिबानचे झेंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 16:36 IST

Pakistan And Taliban:पाकिस्ताननं तालिबानच्या मदतीसाठी 10 हजार सैनिकांना अफगानिस्तानच्या वॉर-झोनमध्ये पाठवल्याची माहिती

ठळक मुद्दे भारताची अफगाणिस्तानात 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक

कंधार: अफगाणिस्तानच्या ज्या स्पिन बोल्डक परिसरात 16 जुलै रोजी भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती, त्या ठिकाणी आता तालिबान आणि पाकिस्तानचे झेंडे फडकताना दिसत आहेत. यावरुन तालिबानसाठी असलेलं पाकिस्तानचं प्रेम समोर आलंय. दरम्यान, पाकिस्ताननं तालिबानच्या मदतीसाठी आपल्या 10 हजार सैनिकांना अफगानिस्तानच्या वॉर-झोनमध्ये पाठवल्याची माहितीही समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI नं त्यांच्या सैन्याला अफगाणिस्तानातील भारताने तयार केलेलं इंफ्रास्ट्रक्चर उद्धवस्त करण्यास सांगितलं आहे. दरम्यान, मागील अनेक वर्षापासून दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्क अफगानिस्तानातील भारतीय असेट्सला नुकसान पोहचवत असून, या संघटनेलाही पाकिस्तानचं समर्थन आहे.

भारताची अफगाणिस्तानात 3 अब्ज डॉलरची गुंतवणूकमागील दोन दशकात भारताने अफगाणिस्तानात अनेक क्षेत्रांमध्ये 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. यात अफगाणी संसदेसह अनेक राष्ट्रीय महामार्गांचे निर्माण आहे. तसेच, भारताने अफगाणिस्तानातील शिक्षण क्षेत्रातही योगदान दिले आहे. शिक्षकांच्या ट्रेनिंगपासून शिक्षणासाठी लागणारे इंफ्रास्ट्रक्चर भारताने तयार करुन दिले आहे. 

दानिशच्या मृत्यूवर तालिबानचे स्पष्टीकरणतालिबानने शुक्रवारी फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकीच्या हत्येवर दुःख व्यक्त केलं. तालिबानकडून सांगण्यात आलं की, आम्हाला न सांगता पत्रकार युद्ध क्षेत्राकडे येत आहेत. कोणाच्या गोळीत दानिश यांचा मृत्यू झाला, हे आम्हाला माहित नाही. यापुढे युद्ध क्षेत्राकडे एखादा पत्रकार येत असेल, तर त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही त्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊ. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी