शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान नरमला; कुलभूषण जाधव यांना अखेर मिळणार राजनैतिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 09:44 IST

निकालानंतर 24 तासातच पाकिस्तानने स्वत:ला जबाबदार देश असल्याचे सांगत गुरुवारी रात्री उशिरा हा निर्णय घेतला आहे. 

इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फटकारल्यानंतर कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत देण्यासाठी तब्बल 16 वेळा नकार देणारा पाकिस्तान नरमला आहे. निकालानंतर 24 तासातच पाकिस्तानने स्वत:ला जबाबदार देश असल्याचे सांगत गुरुवारी रात्री उशिरा हा निर्णय घेतला आहे. 

पाकिस्तानी मंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील कायद्यानुसार भारतीय नागरिक असलेल्या जाधवना राजनैतिक मदत देण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यावर काम सुरू आहे. महत्वाचे म्हणजे याआधी पाकिस्तानने सलग 16 वेळा जाधव यांना राजनैतिक मदत देण्यास भारताला नकार दिला होता. यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालायचे दरवाजे ठोठावले होते. 

पाक मंत्रालयाने हे देखील स्पष्ट केले आहे की, जाधव यांना राजनैतिक संबंधांबाबत व्हिएन्ना करारानुसार त्यांच्या अधिकाराची माहिती देण्यात आली आहे. एक जबाबदार देश असल्याच्या नात्यातून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या कायद्यानुसार ही मदत पोहोचवली जाईल. 

आयसीजेने पाकिस्तानला दिला होता आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला आदेश देत जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर पुन्हा विचार करण्याच आणि राजनैतिक मदत देण्याचे आदेश दिले होते. हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे. भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी जाधव यांना 2017 मध्ये पाकिस्तानने कथित हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान