शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 06:34 IST

पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारतावर सकाळी ४:३० वाजता हल्ला करण्याची योजना आखली होती

इस्लामाबाद : भारताने ९-१० मे दरम्यान ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी केलेल्या प्रहारामुळे पाकिस्तानचा नियोजित हल्ला फसला, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिली. रावळपिंडीतील नूर खान विमानतळासह ११ ठिकाणी भारताने निशाणा साधला होता. पाकिस्तानने पश्चिम सीमेलगत भारतीय नागरी भागांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही कारवाई केली.

ते म्हणाले की, पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारतावर सकाळी ४:३० वाजता हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र, त्याआधीच भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर आणि महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला. शरीफ सध्या चार देशांच्या दौऱ्यावर असून भारत-पाक संघर्षाबाबत बुधवारी अझरबैजानच्या लाचिन शहरात दिलेल्या भाषणात त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली.

अझरबैजान-तुर्कस्तान-पाकिस्तान अशा त्रिपक्षीय परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, भारताच्या 'आक्रमक भूमिके'मुळेच दोन्ही देशांतील संघर्ष वाढला. त्याने हल्ला केल्यावर आम्हाला देशाच्या संरक्षणासाठी कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. (वृत्तसंस्था)

लढाईचे स्वरूपच बदलले 

भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करत अत्यंत अचूकपणे पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ले केले. 

भारतीय शहरांवर हल्ला पाकिस्तानकडून त्यानंतर ड्रोनद्वारे करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु भारतीय हवाई संरक्षण प्रणाली एस-४०० आणि आकाश यांनी ते ड्रोन पाडले. त्यानंतर भारतानेही पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केले. 

पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनिर यांनी शांती प्रस्थापित होण्यासाठी शस्त्रसंधी करण्याचा सल्ला दिला. भारताशी संघर्ष अधिक न वाढवता तो थांबवावा असे माझेही मत होते, असे शरीफ म्हणाले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान