शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान ट्रेन हायजॅक: लष्कराचा १०४ जणांना वाचविल्याचा दावा, बलुच आर्मीचा सोडल्याचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 07:55 IST

Pakistan Train Hijack latest news: बलुचिस्तान प्रांतातील फुटीरतावादी बंडखोर संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने गेल्या काही काळापासून पाकिस्तानच्या नाकी नऊ आणलेले आहे.

पाकिस्तानात बलुच लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेने २१४ प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनचे अपहरण केले होते. या अपहरणावेळी ट्रेनमधील सहा पोलिसांना मारण्यात आले होते. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पाकिस्तानने १०४ प्रवाशांना वाचविल्याचा दावा केला आहे. तसेच १६ बीएलएचे दहशतवादी मारले गेल्याचेही सांगितले आहे. 

बलुचिस्तान प्रांतातील फुटीरतावादी बंडखोर संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने गेल्या काही काळापासून पाकिस्तानच्या नाकी नऊ आणलेले आहे. चीनचे सुरु असलेल्या प्रकल्पांवरही ही संघटना हल्ले करत आहे. अशातच मंगळवारी एका बोगद्यात जात असलेली ट्रेन हायजॅक करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. 

क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये ४०० हून अधिक प्रवासी होते. बलुचिस्तान प्रदेशातील एका बोगद्यात ट्रेन शिरताच, बलुच बंडखोरांनी त्यावर हल्ला केला आणि ट्रेनचा ताबा घेतला. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी अतिरेक्यांच्या तावडीतून १०४ ओलिसांची सुटका केली आहे.

तर दुसरीकडे बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केल्याने महिला आणि मुलांना सोडण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्याने कारवाई केली परंतू त्यांचा हल्ला उधळून लावण्यात आला आहे. सर्व बलुच लढवय्ये सुरक्षित आहेत. आता ओलिस असलेले लोक हे बहुतांश पाकिस्तानी सैन्याचे कर्मचारी आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 

बलुच आर्मीच्या मागण्या काय...बलुचिस्तानला ते एक वेगळा प्रांत, एक वेगळा देश मानतात. तिथे वेगळे सरकार चालवतात. बलुचिस्तानमध्ये कोणत्याही पाकिस्तानी एजन्सीचा किंवा सुरक्षा एजन्सीचा प्रतिनिधी नसावा, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. चीनसोबत सुरु असलेले सीपीईसी प्रकल्प खनिजांचे शोषण करत आहेत. यामुळे समुदायाच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर विस्थापित व्हावे लागले आहे. अनेक वर्षांपासून हे प्रकल्प येथून हटवण्याची मागणी करत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादीInternationalआंतरराष्ट्रीय