शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान भेदरला... म्हणाला, भारतीय आक्रमणाला प्रत्युत्तर देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:16 IST

सशस्त्र दले व जनतेला सज्ज राहण्याचे पाक सरकारचे आवाहन

इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोटच्या दहशतवादी तळावर जोरदार हल्ला चढवून दहशतवाद्यांना संपविल्याचा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळून लावत भारताच्या आक्रमणाला ‘आम्ही आमच्या पसंतीची वेळी आणि ठिकाणी’ प्रत्युत्तर देण्याचा पंतप्रधान इम्रान खान यांनी निर्धार केला. मात्र पाकिस्तानचा सूर नरमाईचा दिसत आहे.

हल्ल्यानंतर पाकिस्तानने सुरक्षा समितीची बैठक घेतली. यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सशस्त्र दले व जनतेला कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज राहण्याचे आवाहन केले. भारताच्या आक्रमणात कोणीही मरण पावलेले नाही, असा पाकचा दावा आहे. ३५0 दहशतवादी ठार झाल्याचा भारताचा दावा पाकच्या सुरक्षा समितीने फेटाळून लावला. बालाकोट भागात जैशचे दहशतवादी तळ नाहीतच, असा दावाही पाकिस्तानने केला आहे.सुरक्षा समितीने जगातील प्रसार माध्यमांना प्रत्यक्ष घटनास्थळी घेऊन वस्तुस्थिती पाहण्यासाठी निमंत्रित केले आहे. मात्र या प्रसारमाध्यमांना पाकिस्तान सरकार कोणते ठिकाण दाखवणार, हा प्रश्नच आहे. पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महेमूद कुरेशी यांनी म्हणाले की, भारताने एलओसीच्या पलीकडे केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ . भारताने ज्या भागात हल्ला केला त्या भागात ‘जैश-ए- मोहम्मद’चे तळ नाहीत. भारतात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असा प्रचार केला जात आहे. सुरक्षा समितीने म्हटले आहे की, भारताला योग्य वेळी, योग्य ठिकाणी उत्तर देईल.पाकिस्तानने बोलावले संसदेचे विशेष अधिवेशननिवडणुकीच्या काळात फायदा लाटण्यासाठी भारताने ही कारवाई केल्याचा दावा करत, यामुळे विभागीय शांतता आणि स्थैर्य धोक्यात आल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. तसेच देशाला विश्वासात घेण्यासाठी पाकिस्तान सरकारने संसदेचे संयुक्तअधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या कारवाईची माहिती देण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान जगभरातील नेत्यांशीही चर्चा करणार आहेत. इम्रान खान यांनी बुधवारी नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलाविली आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खान