शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 09:37 IST

शिया आणि सुन्नी समुदायांमध्ये रविवारी स्थानिक प्रशासकीय पक्ष आणि दोन्ही समुदायांच्या ज्येष्ठांच्या बैठकीनंतर सात दिवसांचा संघर्ष विराम लागू करण्यात आला, परंतु हा संघर्ष सुरूच राहिला

पाकिस्तानच्या अशांत उत्तर पश्चिममधील कुर्रम जिल्ह्यात शिया आणि सुन्नी समुदायात जोरदार संघर्ष सुरू आहे. याठिकाणी मंगळवारी कमीत कमी १० लोकांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झालेत. गेल्या ७ दिवसात या संघर्षात १०० लोक मारले गेलेत. संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नसून हिंसक आंदोलन आणखी भडकत आहे. गोजाघारी, मातासानगर आणि कुंज परिसरात हा संघर्ष पेटला आहे.

कुर्रम जिल्ह्यातील उपआयुक्त जावेदुल्लाह महसूद यांनी पुढाकार घेत दोन्ही समुदायात एक करार केला. त्यात संघर्ष विराम करण्यासाठी १० दिवसांची सहमती झाली. मागील आठवडाभरात १०० लोकांनी जीव गमावला आहे तर १८० जण जखमी झालेत. सर्व सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी बंदोबस्ताला आहेत. पोलीस आणि सैन्याचे जवानही कुर्रम जिल्ह्यात तैनात केले आहेत. कुर्रम जिल्ह्यातील अलीजाई आणि बगान समुदायाच्या संघर्षाची ठिणगी पराचनार येथे प्रवासी बसवर झालेल्या हल्ल्यात ४७ जण मृत्युमुखी पडल्यानंतर पेटली. शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही समुदायात संघर्ष झाला आणि हिंसेत ३७ लोक मारले होते. या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी घेतली नाही.

शिया आणि सुन्नी समुदायांमध्ये रविवारी स्थानिक प्रशासकीय पक्ष आणि दोन्ही समुदायांच्या ज्येष्ठांच्या बैठकीनंतर सात दिवसांचा संघर्ष विराम लागू करण्यात आला, परंतु हा संघर्ष सुरूच राहिला. मात्र नंतर त्यात वाढ झाली असून अजूनही हिंसाचार सुरूच आहे. कुर्रम जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा झाला आहे. पराचनार येथे झालेल्या हिंसाचारानंतर रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे औषधांची आवक कमी आहे. रुग्णांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानच्या पख्तुनख्वा प्रांतातील अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कुर्रम जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

सुन्नीबहुल पाकिस्तानातील २४ कोटी लोकसंख्येपैकी १५ टक्के शिया मुस्लिम आहेत. दोन्ही गट साधारणपणे शांततेने एकत्र राहत असले तरी, विशेषतः कुर्रममध्ये तणाव कायम असतो. सध्याच्या हिंसाचाराचा संबंध जमिनीच्या वादाशी आहे. काही दिवसांपूर्वी  पख्तूनख्वामध्ये शिया मुस्लिम नागरिकांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या आदिवासी भागात जमिनीच्या वादावरून शिया आणि सुन्नी मुस्लिमांमध्ये अनेक दशकांपासून तणाव आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानMuslimमुस्लीम